167 वर्षानंतर होणार हा महासंयोग : या नवरात्रीमध्ये पुजा कलशात नक्की टाका ही 1 वस्तु.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो 167 वर्षानंतर नवरात्रात येणार आहे हा अद्भुत धनुष्ययोग व या काळात केले जाणारे उपाय सांगणार आहोत. नवरात्रात देवी यांच्या नऊ रूपांचे आपण श्रद्धा भावनेने व विश्वासाने पूजन करतो.

नवरात्र उत्सवाची सुरुवात 17 ऑक्टोबर शनिवार पासून होत आहे. पंचांगानुसार यावेळी देवी आईची नवरात्रात घोड्यावर बसून आगमन होत आहे. व देवी रेड्यावर बसून गमन करणार आहे.

यावेळी नवरात्र मध्ये चार सर्वार्थ सिद्धी योग बनत आहेत. यातील सर्वात पहिला सर्वार्थ सिद्धि योग 17 ऑक्टोबरला शनिवारी म्हणजेच घटस्थापना दिवशी बनत आहे.

जो खूपच लाभदायक असेल. या योगात कलश स्थापना व देवी आईची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर 19, 23 आणि 24 ऑक्टोबरलाही सर्वार्थ सिद्धी योग असेल.

पुराणानुसार नवरात्री चा काळ हा देवी आईचे पूजन करण्याचा सर्वात श्रेष्ठ काळ मानला जातो.देवीची नऊ रूपे भक्तांना आनंद, शक्ती व ज्ञान प्रदान करणारी मानली जातात.

म्हणून नवरात्रातील प्रत्येक दिवस देवळाई च्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी समर्पित केलेला आहे. देवी आई चे प्रत्येक रूप आपल्या सगळ्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करतात.

घटस्थापनेचा शुभमुहूर्त 17 ऑक्टोबरला सकाळी 06:27 पासून ते सकाळी 10.13 पर्यंत आहे. घटस्थापना करण्याचा अभिजित मुहूर्त असेल सकाळी 11:44 पासून ते 12.29 पर्यंत.

प्रतिपदा तिथीची सुरुवात 17 ऑक्टोबरला पहाटे एक वाजता होईल आणि समाप्ती 17 ऑक्टोबरला रात्री 09.09 होईल.
25 ऑक्‍टोबरला सकाळी 07:41 पर्यंत नवमी तिथी असेल.

त्यानंतर दशमी तिथीची सुरुवात होईल जी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत असेल. ज्यामुळे नवमी व दशमी म्हणजेच दसरा एकाच दिवशी साजरा केला जाईल.

घटस्थापना कशी करावी –
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना चे विधान आहे. घटस्थापनेचा एक दिवस अगोदर पासूनच घटस्थापनेचे सर्व सामग्री एकत्र करून ठेवावी. त्यानंतर घटस्थापना दिवशी सकाळी स्नान करून देवघराची स्वच्छता करून घ्यावे.

सर्व देवी-देवतांना स्नान घालून स्वच्छ वस्त्राने पुसून काढावे. त्यानंतर एक चौरंग मांडून त्यावर गंगेचे पाणी शिंपडावे व त्यावर लाल कापड अंथरावे. आता त्या कापडावर देवी आईचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी.

आपल्या देवघरातील चांदीच्या देवी किंवा कुलदेवी असतील त्यांची स्थापना करावी. प्रत्येक देवीच्या प्रतिमेखालि विड्याचे पान ठेवावे. त्यानंतर घटस्थापने साठी स्वच्छ काळी माती घेऊन त्यामध्ये गहू किंवा सप्तधान्य मिक्स करावे.

त्यानंतर घट म्हणून तांब्याचा तांब्या किंवा मातीचा घट घ्यावा. त्यामध्ये शुद्ध पाणी टाकून त्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकावे त्यात पान, सुपारी, हळद-कुंकू, हळकुंड, अक्षता व एक रुपयाचे नाणे टाकावे. कलशाला सगळ्या बाजूंनी लाल दोरा बांधावा.

कलशामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाने टाकावीत. त्यानंतर त्यावर नारळ ठेवावा. कलशाला आठ दिशांनी आठ कुंकुवाचे टिळे लावावेत, त्यावर अक्षता टाकाव्यात. त्यानंतर व्रताचा संकल्प करून देवी आई व गणपती बाप्पांचे स्मरण करावे.

घटस्थापना झाल्यानंतर देवी आईना लाल वस्त्र, लाल फुले, सौभाग्याचे सामान, धुप दीट सर्व अर्पण करावे. एक अखंड दिवा तेवत ठेवावा एक फुलांची माळ घटाला अर्पण करावी. अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर देवी आईला खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा व आरती करावी.

अशाप्रकारे नऊ दिवस यथासांग पूजन करावे. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन करून त्यांना भोजन द्यावे.दुर्गासप्तशतीचा पाठ करावा. घटस्थापना करण्यापूर्वी घराची व्यवस्थित स्वच्छता करावी. घटस्थापना करताना शुभ मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावरच कलशाची स्थापना करावी.

देवीचे रोज पूजन करताना देवीला लाल रंगाची फुले जरूर अर्पण करावीत. कारण देवीला लाल रंग अति प्रिय आहे. घटाला रोज एक फुलांची माळ अर्पण करावे म्हणजे नवरात्रीच्या नऊ माळी घटाला अर्पण कराव्यात.

घटस्थापनेनंतर नवरात्रात जर नऊ दिवस आपण दररोज घरात दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची लवकरच पूर्तता होते. नवरात्रात जर शक्य असेल तर नऊ दिवसाचे व्रत करावे.

व्रत करणे शक्य नसेल तर सात्विक आहार बनवावा आणि तोच ग्रहण करावा. नवरात्रात अखंड दिवा लावणे खूप शुभ असते. नवरात्रात दररोज देवी आईच्या वेगवेगळ्या रूपा चे पूजन केले.

व त्याप्रमाणे त्यांना नैवेद्य अर्पण केला तर आपल्यावर देवी आईची खूप कृपा होते. आपल्या सौभाग्यात वृद्धी होण्यासाठी देवी आईला सौभाग्य अलंकार अर्पण करावे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment