2023 चे पहिले सूर्यग्रहण भारतासाठी ठरणार विनाशकारी..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! सूर्यग्रहण हे विज्ञान आणि ज्योतिष या दोहोंमध्ये महत्त्वाचे मानले गेले आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. ज्योतिष शास्त्रातही ग्रहणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. धार्मिकदृष्ट्या, सूर्यग्रहण ही शुभ घटना मानली जात नाही कारण ही वेळ ती आहे जेव्हा सूर्यावर राहूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य राहुच्या प्रभावाने पीडित होतो.

2023 चे पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण या दिवशी सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 या वेळेत होईल. वर्षातील पहिले ग्रहण मेष आणि अश्विनी नक्षत्रात होईल. हे ग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, तैवान, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर आणि न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे.

भारतात दिसत नसल्यामुळे त्याचा सुतक काळ भारतामध्ये असल्याचं मानला जाणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार या सूर्यग्रहणाचा कोणताही धार्मिक परिणाम होणार नाही आणि मंदिराचे दरवाजे देखील या काळात बंद होणार नाहीत. हे ग्रहण कंकणकृती सूर्यग्रहण असेल. जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर इतके असते की चंद्र सूर्याच्या मध्यभागी येताना दिसतो तेव्हा सूर्याचे एक वलय दिसते. याला कंकणकृती किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण असेही म्हणतात. ही स्थिती फार कमी काळासाठी असते.

ग्रहण काळात रुग्ण आणि ग’ र्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळावे. सूर्यग्रहणाच्या वेळी, भगवान सूर्यदेव, भगवान शिव किंवा कोणत्याही देवतेची यथाशक्ती पूजा करा. या काळात कोणत्याही मूर्तीला स्पर्श करणे टाळावे. ग्रहण काळात काहीही खाणे टाळा.  ग्रहण संपल्यानंतर स्नान करून पवित्र होऊन शिजवलेले ताजे अन्न खावे.

या वर्षीच्या ग्रहण काळामधे भारतावर या ग्रहणाचा काय परिणाम होईल याबद्दल सांगताना ज्योतिषांनी असे सांगितले आहे की, हे वर्ष भारतासाठी खूप शुभ असेल.  याशिवाय ग्रहांच्या हालचालीही कोरोनाचा भारतावर परिणाम होणार नसल्याचे सांगत आहेत. भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत राहील. मात्र, राजकारणात उलथापालथ होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment