28 एप्रिल मोठा गुरुवार प्रदोष काळ, चुपचाप ठेवा इथे मूठभर तांदूळ, अक्षय्य धनप्राप्ती होईल.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. 28 एप्रिल गुरुवारचा दिवस आणि या दिवशी चैत्र महिन्यातील प्रदोषव्रत आलेला आहे. प्रदोष व्रत भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. या दिवशी आपण आपल्या घरातच किंवा जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिव-शंभूंच दर्शन नक्की घ्या आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवशंभूंची पूजा या दिवशी हे अवश्य करावी. प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वीचा अर्धा तास आणि सूर्यास्त झाल्यानंतर अर्धा तास, म्हणजे हा जो एकूण 1 तासाचा कालावधी असतो त्याला प्रदोष काळ असं म्हणतात.

या काळात शिवशंभूंची केलेली पूजा ही अत्यंत फलदायी मानण्यात आलेली आहे. या दिवशी भगवान शिव शंभूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण कोण-कोणते उपाय करू शकतो. सर्वात पहिली गोष्ट तर आपल्या कुंडलीतील गुरु दोष दूर करण्यासाठी या दिवशी भगवान शिव-शंभूंच पूजन करावं. आपल्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने जर आपण अंघोळ केल्यास त्यामुळे शुभफळ प्राप्त होतात.

विशेष करून ज्यांच्या विवाहमध्ये अडचण येत आहे विवाह योग जुळत नाहीत अशा अविवाहित तरुण तरुणीनी तर हा उपाय आवर्जून करावा. या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंचे सुद्धा पूजा केली जाते, कारण हा गुरुवारचा दिवस आहे. जो भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित आहे शिवशंभु पूजेमध्ये जर कोणतीही सामग्री नसेल तर कमीत कमी आपल्या घरातलं तांब्याभर पाणी हे शिवलिंगावर अर्पण करावं. तत्पूर्वी आपण एखाद्या बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू शकता.

या 2 सामग्रीनी सुद्धा शिवशंकर प्रसन्न होतात. ज्या लोकांच्या घरात आजारपण आहे अशा लोकांनी आजारांतून मुक्ती मिळण्यासाठी रोगमुक्ती साठी यादिवशी शिवलिंगावरती तांब्याभर पाण्यामध्ये एखादा गुळाचा खडा टाकून हे जल शिवलिंगावर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावं. यामुळे रोगातून मुक्ती मिळते. महिलांनी ओम नमः शिवाय असं न म्हणतात, तर ” नमः शिवाय ओम”, या मंत्राचा जप करावा.

याशिवाय या दिवशी भगवान शंकरांना सफेद वस्त्र आणि माता पार्वती लाल रंगाचे वस्त्र अर्पण केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी नांदते. ज्या लोकांच्या घरात गरिबी आहे किंवा ज्यांना आपल्या घरात धन संपत्ती वाढावी अशी ज्यांची इच्छा आहे अशा लोकांनी वाटीभर तांदूळ म्हणजेच अक्षता घ्यावेत. असे वाटीभर अक्षद घ्यावेत आणि त्यातील अर्धे तांदूळ हे आपण भगवान शिवशंकर यांना अर्पण करावेत आणि उरलेले अर्धे तांदूळ आहेत ते एखाद्या गोरगरिबाला गरजूला दान करावेत.

जे तांदूळ अर्पण केलेले आहेत हे अर्पण केलेले तांदूळ पूजा संपन्न झाल्यानंतर एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यात बांधून ही कपड्याची पोटली आपल्या तिजोरीत किंवा जमा पैशांच्या ठिकाणी ठेवून द्यावी. पैशांमध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. जर मुलाबाळांवर ते एखादं संकट आलेलं असेल, मुलाबाळांचे जीवनात काही अडचणी असतील तर या प्रदोषच्या दिवशी आपण मुलांच्या हातून मिठाईचे वाटप करा आणि भगवान शिवशंकर यांच्या पंचाक्षरी मंत्राचा “ओम नमः शिवाय” किंवा “नमः शिवाय ओम” या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्यास आपल्या मुलाबाळांना सांगा.

त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख बाधा संकटे अडचणी नक्की दूर होतील. या दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर तीळ मिश्रीत जल म्हणजे आपण तांब्यावर पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकून त्या पाण्याने त्यांचा अभिषेक केला तर त्यामुळे रोग दूर होतात. या दिवशी पिवळ्या रंगाचे खाद्य पदार्थ, वस्तू आणि वस्त्र यांचा दान आपण गोरगरिबांना अवश्य करा. याचा फळ म्हणजे आता सुख समृद्धी नांदू लागते.

या दिवशी गोरगरिबांना, असहाय्य लोकांना अपंगांना जर आपण भोजन घातलं तर त्यामुळे सुद्धा शिवशंभु प्रसन्न होतात. हा गुरुवारचा दिवस असल्याने या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची सुद्धा पूजा केली जाते ती श्रेयस्कर मानले जाते आणि म्हणून आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. यामुळे गुरु ग्रह मजबूत होतो आणि गुरु ग्रहाच्या मजबुतीने जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू लागतं.

शास्त्र असं म्हणत की, या दिवशी प्रदोष व्रताची जी व्यक्ती व्रत करते तिला तिच्या शत्रूंवर विजयाची प्राप्ती होते. सोबतच जर जीवनामध्ये खूप मोठे दुःख असतील, या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप आपण आवर्जून करावा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!