मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी पिठोरी अमावस्येला करा यापैकी एक दान.. घरावरील इडापिडा होईल दूर..!!
नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो..
बैल पोळा – पिठोरीअमावस्या म्हणजेच श्रावण अमावस्या होय. ही अमावस्या आज दि.06-09-2021 रोजी सोमवारी सकाळी 07:40 नंतर सुरू होत असुन अमावस्या तिथी संपूर्ण दिवस व रात्रभर आहे असुन सात तारखेला सकाळी सूर्योदयापर्यंत असणार आहे.
पिठोरी अमावस्या केवळ उत्तर भारतातच नाही तर दक्षिण भारतातही साजरी केली जाते. ही अमावस्या उत्तर भारतात कुशोत्पटिनी अमावस्या म्हणून ओळखली जाते, तर दक्षिण भारतात त्याला पोलाला अमावस्या म्हणतात. दक्षिण भारतात या दिवशी पोलेरम्मा देवीची पूजा केली जाते. पोलेरम्मा हे देवी पार्वतीचे रूप मानले जाते.
पिठोरी अमावस्येचे महत्त्व –
पिठोरी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला पूर्वजांना नैवेद्य अर्पण करून त्यांची पूजा केल्याने घरात सुख आणि शांती येते. तसेच, पिठोरी अमावस्येला दुर्गामातेची पूजा करून व्रत ठेवल्याने पुत्र-रत्न प्राप्त होतो. हे व्रत मुख्यतः सुवासिनींनी करावयाचे आहे.
याला मातृदिन असेही म्हणतात. यादिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करून घरातील मुलास अगर मुलीस खीर पुरीचे वाण देतात. चौसष्ट योगिनीच्या प्रतिमेच्या फोटोच्या कागदाचे पूजन करतात.
तसेच मुला-मुलीच्या खांद्यावरून पुरणपोळी मागे नेत नेत “अतीत कोण”? हा प्रश्न करतात व मुल-मुली “मी” म्हणून असे उत्तर देतात. ही क्रिया तीन वेळेस असे करावी लगते. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले की अखंड सौभाग्य व दीर्घायुः असणारी अपत्ये होतात अशी मान्यता फार पूर्वीपासून आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सणाचे महत्त्व आपला बळीराजा शेतकरी यासाठी खूप महत्त्वाचे आहे. बैलांना चांगले सजवतात व पुरणाची पोळी खाऊ घालतात. गाईचे बैलाबरोबर लग्न लावतात. वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या प्रथेनुसार वाजत गाजत बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
पूजा विधी – पिठोरी अमावस्येच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. अमावास्येच्या दिवशी पीठाच्या लहान लहान64 मूर्ती बनवाव्या. या मूर्तींना नवीन कपडे घालून सजवावे. यानंतर, पूजा घर फुलांनी सजवून या मूर्ती ठेवाव्या.
असे मानले जाते की माता पार्वतीने इंद्राच्या पत्नीला पिठोरी अमावस्येची कथा सांगितली. तसेच या दिवशी देवी पार्वतीला नवीन बांगड्या, कुंकू आणि सौभाग्यदायी वस्तू अर्पण कराव्या.याशिवाय पिठोरी अमावस्येच्या दिवशी शिवाची पूजा केल्यानेही विशेष लाभ होतात.
पिठोरी अमावस्येला हे उपाय करा –
पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी विशेष उपाय करता येतात. यासाठी सर्वप्रथम आपल्या घराजवळील नदी किंवा तलावात स्नान करा. त्यानंतर घरातील पुरुषांनी पांढरे कपडे परिधान करून पूर्वजांना प्रार्थना करावी.
त्यानंतर घरगुती डाळी, तांदूळ किंवा शिजवलेले अन्न आणि काही पैसे गरिबांना दान करा. याशिवाय ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी किंवा शिधा दान करावा. त्यामुळे आपल्या पूर्वजांना शांती लाभते. संध्याकाळी देवघर स्वच्छ करा.
नंतर एका ताटात पिठाचा दिवा बनवून त्यात मोहरीचे तेल टाकावे. त्या ताटात मिठाई, फळे आणि फुले ठेवा आणि संपूर्ण घरावरून उतरावा आणि तो दिवा घराजवळील मंदिरात ठेवावा. यामुळे घरावरील इडापिडा टळेल. सुखशांती नांदेल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल.
साक्षात् चंद्रमा ज्यांच्या भाळी विराजमान आहे अश्या शिवजींची देखील मनोभावे पूजा केली तर आपणास खुप लाभ होतो. त्यासाठी एका भांड्यात दूध, जल आणि पांढरी फुले घेऊन ती शिवाजींना अर्पण करा, देव प्रसन्न होतील.
याशिवाय मानसिक शांतीसाठी चंद्राची पूजा करा. गरीबांना दान करा. तसेच चांदीच्या आणि तांब्याच्या वस्तू दान करा. अमावास्येच्या दिवशी चांदी दान करणे विशेषतः फलदायी असते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!