Tuesday, March 19, 2024
Homeअध्यात्म7 डिसेंबर.. बुधवार दत्त जयंती.. स्वामींना दाखवा त्यांच्या आवडीचा विशेष नैवेद्य..

7 डिसेंबर.. बुधवार दत्त जयंती.. स्वामींना दाखवा त्यांच्या आवडीचा विशेष नैवेद्य..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! 7 डिसेंबर बुधवार आज दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या स्वामींसाठी करा हा विशेष नैवेद्य सर्व मनोकामना पूर्ण होतील, स्वामी प्रसन्न होतील, स्वामींची कृपा होईल. मित्रांनो 7 तारखेला स्वामी सेवेकऱ्यांसाठी स्वामी भक्तांसाठी खास मोठा दिवस आहे. हा दिवस आहे श्री दत्त जयंतीचा हा स्वामींच्या भक्तांसाठी विशेष सेवेचा दिवस असतो. त्यासाठी आपण या दिवशी स्वामींसाठी आपल्या स्वामींसाठी एक विशेष नैवेद्य घरातच बनवायचा. घरातल्या महिलांनी हा नैवेद्य घरात बनवायचा आहे.

तो सकाळी करा संध्याकाळी करा. जेव्हाही तुम्हाला करायचं असेल तेव्हा करा सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल. या नैवेद्यामध्ये आपल्याला स्वामींच्या आवडीचे पदार्थ करायचं आहे. हो मित्रांनो स्वामींना काही पदार्थ आवडतात. त्याच पदार्थांबद्दल आपण जाणुन घेऊयात आणि या नैवेद्यामध्ये तुम्ही काय करू शकता.? तर मित्रांनो या नैवेद्यामध्ये तुम्हाला पुरणपोळी खीर करायची आहे.

पुरणपोळी खीर त्यासोबत तुम्हाला कांदा भजी करायची आहे. त्यानंतर आमटी भात मित्रांनो हे पदार्थ स्वामींना अत्यंत आवडीच आहे. जेव्हा स्वामी हयातीमध्ये होते तेव्हा स्वामींसाठी भक्त सेवेकरी आणि नैवेद्य आणायचे. तेव्हा स्वामी आवडीने खायाचे.

खास करून पुरणपोळी स्वामींना अत्यंत आवडते, कांदा भजी स्वामीना अत्यंत आवडते, आमटी भात सुद्धा स्वामींना आवडतो. तर तुम्ही तुमच्या परीने तुमच्या सोयीनुसार तुम्ही पुरणपोळी खीर करा, कांदा भजी करा, आणि आमटी भात करा.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की, आम्हाला हे जमत नसेल, आम्हाला जर हे करणे शक्य नसेल तर आम्ही काय करू शकतो.? तर मित्रांनो ज्यांना शक्य असेल ज्यांना जमत असेल त्यांनीच हा नैवेद्य करायचा आणि बाकीच्यांना जमत नसेल किंवा शक्य नसेल तर त्यांनी चपाती भाजी सुद्धा प्रेमाने श्रद्धेने विश्वास ठेवून दाखवली.

फक्त दुधात चिमूटभर साखर टाकून जरी दाखवली तरी स्वामी ते ग्रहण करतात आवडीने ग्रहण करतात आणि स्वामी प्रसन्न होतात कृपा करतात. तर अस समजू नका की तुम्हालाही पुरणपोळी खीरच करायची आहे. कांदा भजी आमटी भात करायच आहे असं नाही.

तुम्हाला जे जमेल चपाती भाजी काही गोड दुधात साखर टाकून शिरा केला तरी चालेल. जे घरात केल असेल ते तुम्ही दाखवले तरी चालेल. ज्यांना जमत असेल जे करू शकतात त्यांनीच पुरणपोळी खीर कांदा भजी आमटी भात केला तरी चालेल. तर मित्रांनो 7 डिसेंबरला मोठा बुधवार या दिवशी श्री दत्त जयंती आहे. आपल्या स्वामींसाठी तुम्ही सुद्धा नैवेद्य अवश्य करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स