आईच्या पोटात मुलं कशी शिकतात.?? गर्भसंस्कार का करावे.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आई होणे हा एका स्त्री साठी खूप महत्त्वाचा क्षण असतो. व तिच्या स्त्रीत्वाचा उद्धार होत असतो. आई होण्याची चाहूल जेव्हा एका स्त्रीला लागते तेव्हा, ती मनातल्या मनात आपल्या बाळासाठी काही स्वप्ने रंगवत असते.

जन्माला येण्या आधी आईच्या गर्भामध्ये नऊ महिने ते बाळ असते. या काळामध्ये त्याला कोणते त्रास होतात का ?त्याला काय समजते काय? अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. या प्रश्नाचे उत्तर आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

गरुड पुराणामध्ये व्यक्तीचे जन्म-मृत्यू, स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य याविषयी सांगितला आहे. त्याचबरोबर जन्माला येण्या आधी आईच्या गर्भामध्ये त्या गर्भाला कोणकोणते हाल-अपेष्टा सहन करावे लागतात याची ही माहिती सांगितली आहे. तो गर्भ भगवंतांना काय सांगत असतो याविषयी गरुड पुराणात सांगितले आहे.

गरुड पुराणामध्ये गरुडाने भगवंतांना प्रश्न केला की, आईच्या गर्भात असणारा जीव किंवा नवीन जीवन धारण करताना त्याच्या मनात कोणते विचार असतात किंवा आईच्या गर्भात हे त्यांना कोण कोणते विचार पडत असतात.

त्याविषयी मला माहिती द्यावी. त्यावेळी भगवंताने सांगितले की, आईच्या गर्भात असताना त्या जीवाला आपल्या पूर्वजन्माची जाणीव असते. त्याला आपल्या प्रत्येक जन्माची जाणीव असते. त्याला आपल्या प्रत्येक जन्माची आठवण येत असते.

तू आपल्या प्रत्येक जन्मात केलेले सर्व कृत्य आठवत असतो. केलेल्या पापांची भगवंताकडे क्षमा मागत असतो. प्रत्येक जीव जन्माला आला की त्याचा मृत्यू हा अटळ असतो. म्हणून तो भगवंताकडे मागणी म्हणून मागत असतो.

आणि भगवंताला विनवणी करत असतो की, मला या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर काढावे. मला मुक्ती द्यावी. अशाप्रकारे आईच्या गर्भात असणारा जीव हा आपल्या प्रत्येक जन्माची जाणीव करत असतो. त्याला प्रत्येक जन्माचे कृत्य आठवत असते. आणि तो भगवंताला विनवणी ही करत असतो. ज्या वेळी नऊ महिने पूर्ण होऊन आईच्या गर्भातून तो जीव बाहेर येतो तेव्हा त्याला याचा विरस विसर पडतो. त्याला आपल्या पूर्वजन्मात बद्दल काहीही आठवत नसते.

शास्त्रानुसार आईच्या गर्भातूनजन्म घेताना त्या जीवाला अनेक यातना सहन कराव्या लागतात. त्याच्या डोक्यावर खूप ताण पडतो. त्यामुळेच असावे आपल्या पूर्वजन्मात बद्दल काहीच पाठवत नाही. तो पूर्णपणे अज्ञानी बनतो. याच कारणामुळे तो जीव जन्माला आल्यावर रडू लागतो.

अशाप्रकारे आईच्या गर्भामध्ये असताना त्या जीवाला आपल्या पूर्वजन्माची जाणीव होत असते. आपण केलेल्या सर्व कृती ची त्याला आठवण होत असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा, यातनाही त्याला होत असतात.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment