आज दिप प्रज्वलन करताना दिव्यात टाका ही एक वस्तु : घरातील इडा पिडा जातील : सुख समृद्धी भरभराटी आरोग्य लाभेल..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपण लहान पणापासून बघत आलोय घरात दिव्याच्या मोठ्या अमावस्येच्या दिवशी आई घरातील सर्व दिवे स्वच्छ करुन ते एका पाटावर मांडून ठेवत असते.

दीप अमावस्येला आपल्या घरातील सर्व दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्या दिव्यांना गोडा धोडाचा नैवेद्य दाखवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर मित्रांनो, या अमावस्येच्या दिवशी दिपपूजन करताना त्या दिव्यामध्ये आपल्याला फक्त एक वस्तू टाकायची आहे.

असे केल्याने आपल्या जिवनातील त्रास, दुःख , संकट, कष्ट सर्व संपून जातील. आपल्या घरात जर एखादी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सुद्धा नाहीशी होऊन जाईल. घरामध्ये प्रचंड प्रमाणात भरभराटी, धनसंपत्ती येईल. त्याचबरोबर माता लक्ष्मींचे आपल्या घरातील वास्तव्य दिर्घकाळासाठी वाढेल.

शास्त्रानुसार या दीप अमावस्येला आपण घरामध्ये गीता पठन करण्याची एक जुनी प्रथा देखील आहे. गीता पठणामुळे आपल्या जिवनातील सर्व संकट तर दूर होतातच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांची आवकही अचानक वाढते.

मित्रांनो, अनेक असे उपाय आहेत जे आपण या अमावस्येच्या दिवशी करु शकतो. या दिवशी जर आपण गोर गरिबांना अन्न दा न केल्याने सुद्धा आपल्याला पुण्य लाभते.

तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कुंडलीत काही ग्रह दोष असेल तर या दिवशी कणकेचे छोटे छोटे गोळे करून ते माशांना खाऊ घातल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह दोष निवारणही होत असते.

आता आपण बघूयात या दिप अमावस्येला तुम्ही दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मींचा कृपाआशीर्वाद आपल्याला दिर्घकाळासाठी लाभणार आहे. आपल्या सर्व इच्छा या एकाच उपायाने पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो, पूर्वी साधू महंत या वस्तुबद्दल सामान्य माणसाला सांगत असायचेत. या उपायाचा अवलंब केल्याने घरात बरकत येत असे. ती चामत्कारिक वस्तू म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये वापरात येणारं केशर होय.

होय मित्रांनो, अगदीच थोडंसं केशर घेऊन आपल्याला या दिव्याच्या तेलामध्ये टाकायचं आहे. त्यानंतरच हा दिप प्रज्वलीत करायचा आहे. असे केल्याने मातालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्या सर्व मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करतील.

तर मित्रांनो, केशरमिश्रित या दिप प्रज्वलनामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, वास्तू दोष, आर्थिक समस्या असतील त्या सुद्धा दूर होतील. म्हणूनच मित्रांनो, या दीप अमावस्येला तुम्हीसुद्धा दिव्यामध्ये प्रकारे थोडंसं केशर नक्कीच टाकावे आणि माता लक्ष्मींचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment