आज हनुमान जयंतीच्या दिवशी या मंत्रांचा जप करा, धन आणि यशाने भरून पावाल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. 16 एप्रिल, शनिवारी म्हणजेच आज हनुमान जयंती साजरी केली जात आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हनुमान भक्त हनुमानजींची पूजा तर करतातच शिवाय हनुमानाचा उपवासही करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की असे काही चमत्कारी मंत्र आहेत, ज्यांच्या नावाचा जप केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला धन, यश आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात.

आजचा लेख देखील याच मंत्रांवर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की हनुमान मंत्राचा जप केल्याने कोणते फायदे होतात आणि हे मंत्र कोणते आहेत. चला तर जाणून घेऊया.

मारुतीची उपासना करण्यासाठी व मुख्य म्हणजे यासाठी डावीकडे तोंड असलेला मारुती सर्वोत्तम मानला जातो किंवा आपण दशभुजा मारुतीची सुद्धा पूजा या दिवशी करू शकता. मित्रांनो मारुतीच्या पूजेमुळे शनीची साडेसाती दूर होते तसेच पाठीमागे शनीची साडेसाती लागली असेल किंवा अंतर्दशा महादशा पाठी लागली असेल तर याचे कोणतेही दोष दूर करण्यासाठी या दिवशी एक छोटासा उपाय नक्की करा.

हनुमान जयंतीला या मंत्रांचा जप करा

ॐ हं हनुमते नम:’।

जर तुमच्या जीवनामधे वादविवाद किंवा कोर्टाशी संबंधित काही समस्या असल्यास तर तुम्ही या मंत्राचा जप करून तुमच्या जीवनातील सगळे अडथळे दूर करू शकता.

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय पंचवदनाय दक्षिण मुखे. कराल बदनाय नारसिंहाय सकल भूत प्रेत दमनाय. रामदूताय स्वाहा.
ॐ दक्षिणमुखाय पच्चमुख हनुमते करालबदनाय नारसिंहाय ॐ हां हीं हूं हौं हः सकलभीतप्रेतदमनाय स्वाहाः.

जर तुम्हाला भूत प्रेत आणि काही बाधा अडथळे टाळायचे असतील तर या मंत्राचा जप केल्याने तुम्ही वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता.

अंजनी गर्भसम्भूताय कपीन्द्र सचिवोत्तम रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमान रक्ष रक्ष सर्वदा.

हनुमान स्त्रोत

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्. सकलगुणनिधानं वानराणामधीशं. रघुपतिप्रियभक्तं वातात्मजं नमामि. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकांजलिम. वाष्पवारिपरिपूर्णालोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम्.
सर्व मनोरथ सिद्धि मंत्र
अंजनी के नन्द दुखः दण्ड को दूर करो सुमित को टेर पूजूं. तेरे भुज दण्ड प्रचंड त्रिलोक में रखियो लाज मरियाद मेरी. श्री रामचन्द्र वीर हनुमान शरण में तेरी.
जल खोलूं जल हल खोलूं खोलूं बंज व्यापार आवे धन अपार.
फुरो मंत्र ईश्वरोवाचा हनुमत वचन जुग जुग सांचा.

व्यवसायात यश मिळवण्यासाठी या मंत्राचा नियमित जप करावा. तर दुसरीकडे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजीसमोर दिवा लावून या मंत्राचा जप केल्याने व्यवसायात यश मिळते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment