Wednesday, October 4, 2023
Homeअध्यात्मआज स्वामींचा प्रगटदिन.., मनातील इच्छा बोलून करा या मंत्राचं उच्चारण..!!

आज स्वामींचा प्रगटदिन.., मनातील इच्छा बोलून करा या मंत्राचं उच्चारण..!!

श्री स्वामी समर्थ अर्थातच अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे इसवी सन १९ या शतकात होऊन गेलेले महान संत आहेत, त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे बराच काळ वास्तव्य केले होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्र्येयांचे स्वामी समर्थ तिसरे पूर्णावतार आहेत. गांणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच पुढे नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले आहेत.

मीच नृसिंह भान आहे. श्री शैलम्‌‍ जवळील कर्दळी वनातून मी आलेलो आहे. हे स्वत: स्वामींच्या तोंडचे उद्‌गार, ते नृसिंह सरस्वतींचाच अवतार असल्याचे सुचवतात. अनेक ठिकाणी स्वामी समर्थ विविध नावांनी वावरलेत. पौराणिक कथा व आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशी च्या दिवशी अक्कलकोट येथील वट वृक्ष समाधी मठ स्थानी मध्याह्न समयी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती.

यावर्षी 9 मे 2021 या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी येत असल्याने त्यांच्या भक्तांसाठी हा दिवस एकदम खास आहे. दरवर्षी प्रमाणे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या नाम जपासह विविध कार्यक्रमांची आखणी भक्तांनी केलेली असते. श्री स्वामी समर्थांचं पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवरही वर्चस्व होतं.

सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनातच बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीतही आणले होते. स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले, तसेच स्वामींना दत्त दिगंबरांचा अवतार देखील मानलं जातं. पद्मासनात बसलेली एक प्रसन्न मुद्रा, एका हाती एक मणी, चेहऱ्यावर अनेक युगांच्या खुणा, असीम तेज असे ते स्वामींचे रूप पाहून भक्त प्रसन्न होतात.

स्वामींची अनेक रुपं आहेत जी आपल्याला पाहायला मिळतात. माऊलीच्या रुपात देखील स्वामी शांत व आपल्याला आधार देणारे वाटतात. परंतु त्यांचे रूप जे मूळ स्वरूपात आहे ते म्हणजे पद्मासनात चैतन्यमूर्ती व श-रीरावर तेजस्वी वलये, असिम साधनेचे अमोघ तेजोवलय पाहायला मिळते.

स्वामींच्या प्रतिमेसोबत एक वाक्य कायम असते जे आपले भिती, चिंता दूर करते ते म्हणजे, || भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे..|| स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची सेवा नक्की करावी. घरातील सर्वांनी मिळून यावर्षी घरीच स्वामींची मूर्ती पूजा किंवा फोटो पूजा करावी.

स्वामींच्या सेवेतील सर्व गोष्टी जाणून समजून घेऊन करा व तसेच स्वामींच्या आवडत्या वस्तू, पदार्थ बनवावा. नैवेद्य दाखवावा. तसेच स्वामींचा हा मंत्र सकाळी, सायंकाळी एक जपमाळ हा मंत्रजाप करावा. त्यामुळे मनाला शांती मिळेल, अडचणींतून मार्ग सापडतील, इच्छा पूर्ण होतील. इच्छा बोलून स्वामींना प्रार्थना करावी की येणाऱ्या सं-कटाला तोंड देण्याचं आम्हाला बळ द्या.

|| श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमं: ||

या महामंत्राचा जाप करावा, कमीत कमी एक जपमाळ यरी हा जाप करावा आणि तुम्हाला जर शक्य असल्यास जास्त वेळ सुद्धा हा जाप तुम्ही करू शकतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, असलेल्या सर्व अडचणी दूर होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स