आम्हा दोघांत फक्त श्वासाचं अंतर होतं अन्.. स्वप्निल जोशी बरोबरचा इंटिमेट सीन केल्यानंतर शिल्पा तुळसकर पुढे सांगतात..

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. सौरभ (स्वप्निल जोशी) व अनामिका (शिल्पा तुळसकर) यांच्या नात्यामध्ये मध्यंतरी फुट पडली होती. अनामिकाच्या नवऱ्याची (अशोक समर्थ) एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाने वेगळं वळण घेतलं. आता पुन्हा एकदा सौरभ-अनामिका एकत्र आले आहेत.

स्वप्निल व शिल्पामधील इंटीमेट सीन दाखवण्यात येत आहेत. याचबाबत शिल्पाने अमृता फिल्म्स या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. चित्रीकरणानिमित्त एखादा अभिनेता व अभिनेत्री सतत एकत्र असताना प्रेमात पडणं असं कधी घडलं आहे का.? यावर शिल्पा म्हणते, “स्वप्निल जोशीबाबतच मी सांगते. स्वप्निलबरोबरच माझे खूप छान व इंटिमेट सीन असतात. छान म्हणतेय कारण खूप सुंदररित्या ते चित्रीत केले जातात.”

“इथे माझ्या सहकलाकारांना त्याचं श्रेय द्यायला हवं. स्त्रीला स्प र्शा मधूनच कळतं की इथे काय गडबड आहे. जर सीन करताना माझ्या सहकलाकार काहीही वाटलं असेल तर ते त्याने माझ्या पर्यंत पोहचू दिलं नाही. हेच खूप कठीण काम आहे. जसं मी काम करते तसं काम माझा सहकलाकारही करतो. त्याचबरोबर आपण सुशिक्षित व समजुतदार आहोत. त्या पद्धतीनेच काम करत असतो. जर आपण आपल्यालाच मर्यादा घातल्या नाहीत तर प्रत्येक सेटवर तुम्हाला प्रेम होणार आणि मग तुमचा प्रेमभंग होणारच.”

पुढे त्या म्हणाल्या, “स्वप्निल व मी एक सीन करत होतो. जिथे आमच्या दोघांचं एकमेकांच्या डोक्याला डोकं व नाकाला नाक टेकतं. आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर आहे. आमच्या समोर तिसरा माणूस बसला आहे जो आमच्या दोघांच्या श्वासाच्या अंतरावर आहे. हा सीन चित्रित करत असताना मध्येच स्वप्निल म्हणाला, ऐकना मला असं वाटतं की आपल्या तिघांचं अफेअर आहे. अशाप्रकारचे सीन चित्रीत करणं दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. सेटवर कोणाबरोबर तरी अफेअर होणं हे सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही.” स्वप्निल व शिल्पाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या हिट ठरत आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment