आमलकी एकदशीचा इतिहास काय? कशी करावी पूजा? बघा संकल्प कसा सोडावा.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

असं म्हणतात की ब्रम्हदेवांनी जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हाच त्यांनी आवळ्याच्या झाडाचीही उत्पत्ती केली. आवळा आयुर्वेदात अत्यंत पूजनीय स्थान प्राप्त करतो. आवळ्याचे अनेक फायदेही आपल्याला माहिती आहेत. आमलकी एकादशी काही दिवसांवर आली असल्याने आपण या एकादशी बाबत माहिती घेणार आहोत. आमलकी एकादशी म्हणजे काय

वर सांगितल्याप्रमाणे ब्रम्हदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहातो, देवांमध्ये भगवान श्रीविष्णूंना पाहातो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे.

हे झाड अनेक आयुर्वेदीक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीविष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे. असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात 24 एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या 26 असते.

आवळ्याचं महत्व काय – साधारपणे होळीपासून शरद ऋतू संपून, वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूत तापट उन्हाळा अनुभवायला मिळतो. अशात गोष्टी फार उष्ण होऊ लागतात. त्यावर उपाय म्हणूनही आवळ्यातकडे पाहिलं जातं.

आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्य साधारण आहेत. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे आवळ्याचे उपाय आहेत.

आमलकी एकादशीचं व्रत कसं करावं – आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसात फक्त एकदाच फलाहार करावा. भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी.

श्रीविष्णूचे आवाहन करून त्याचे पूजन करावे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे. भगवंताला नैवेद्य दाखवावा. महत्वाचं म्हणजे हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही. त्यामुळे या व्रताची समाप्ती द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment