आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये लिंबू आणि मिरचीचाच उपाय जास्तीत जास्त का सांगितला जातो..??

मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, अत्यंत उपयुक्त आणि असरदार असे धार्मिक उपाय ज्यामुळे कुठलीही बाधा कुठलेही संकट दूर होते. हिंदु पुराणानुसार अशा काही प्रथा ज्यांना आजही लोक मानतात. काही लोक धार्मिक विधी समजुन त्या अमलात आणतात तर काही त्या प्रथांना अंधश्रद्धा मानतात. या प्रथांच्या मागे फक्त अंधश्रद्धाच नसून काही वैज्ञानिक आधारही दिलेले आहेत.

आपल्या पूर्वजांनी बर्‍याच अनोख्या परंपरा तयार केल्या आणि त्यांचा धर्म आणि कर्म यांच्याशी सं-बंध जोडला गेला. पण आजही आपण त्यांच्यामागील हेतू न जाणता त्यांचे अनुसरण करतो आणि पा-प आणि पुण्य यांच्याशी त्यांचा सं-बंध जोडतो.

चला तर मग अशा काही उपयांबद्दल जाणून घेऊ. ज्यांना काही लोक अंधश्रद्धा म्हणतात, तर काही लोक त्यांना धार्मिक परंपरा म्हणून संबोधतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य करतात.

1) लिंबू आणि मिरची वापरून दृष्ट काढणे –
यामागील दोन मनोरंजक कारणे दिली आहेत. पहिले कारण हे आधुनिक विज्ञानाशी संबंधित आहे. मिरची आणि लिंबू यात साइट्रिक आम्ल आहे ज्याचा वास किडे आणि कीटक दूर करतो आणि वातावरण शुद्ध बनते.

याच्या वासाने सर्व कीटक त्वरित पळून जातात. या व्यतिरिक्त, धार्मिक शास्त्रानुसार लिंबू आणि मिरची दोन्ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात, ज्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा तयार होते.

2) घरातून बाहेर जाताना दही साखर खाणे –
भारत हा उष्ण हवामान असलेला देश आहे. अशा प्रदेशात दही शीतल आणि पौष्टिक असा एक खाद्य पदार्थ आहे. त्यात साखर मिसळून खाल्ल्याने ते केवळ श-रीरात शीतलता आणत नाही तर श-रीरातील ग्लूकोजची कमीही भरून काढते.

तसेच पुराणानुसार दहीसाखर खाऊन बाहेर पडणे शुभ मानले जाते. त्यामुळे आपण हाती घेतलेले काम नक्कीच यशस्वीपणे पूर्ण होते.

3) स्त्रियांनी मा-सि-क पा-ळीच्या वेळी पूजा करू नये –
सध्या तरी यासाठी कोणतेही वैज्ञानिक कारण मानले गेले नाही. परंतु योगशास्त्राच्या अनुसार प्रार्थना, उपासना, ध्यान, योग इत्यादीद्वारे श-रीराची ऊर्जा ऊर्ध्वगामी जाऊन कार्य करते, जी श-रीराच्या सर्व चक्रांना सक्रिय करते आणि मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते.

परंतु जर स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी या धार्मिक कार्यात सहभागी झाल्या तर त्यांची उर्जा देखील ऊर्ध्वगामी कार्य करू लागेल आणि मा-सि-क पा-ळीच्या वेळी जे अशुद्ध र क्त श-रीराबाहेर टाकले जाते त्यात अडथळा निर्माण होऊन स्त्रियांना शा-रिरीक त्रास होऊन त्या आजारी पडू शकतात. कदाचित याकरीता पुरातन ब्रह्मज्ञानी मा-सि-क पा-ळीच्या वेळी स्त्रियांच्या पूजेवर बंदी घालत असावेत.

4) घरात सूर्यास्तानंतर झाडू मारू नये –
पुर्वीच्या काळी वीज नव्हती. अशा परिस्थितीत लोक दिवा किंवा मेणबत्तीच्या प्रकाशाच्या सहाय्याने काम करायचे. या परिस्थितीत रात्रीच्या वेळी झाडले तर अंधारामुळे जमिनीवर पडलेली मौल्यवान वस्तू गमावण्याची भीती देखील होती.

या कारणास्तव सूर्यास्तानंतर झाडू मारण्यास मनाई होती. तसेच माता लक्ष्मी ही तिन्ही सांजेला आपल्या घरात प्रवेश करते आणि तेव्हा जर आपण घर झाडले तर तो तिचा अपमान होईल. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होईल आणि आपल्या घरात दुःख, दारिद्र्य येईल.

5) सूर्यग्रहण बघू नये –
सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्याच्या किरणांपासून थेट डोळ्याने पाहताना डोळ्यांच्या आतील पडद्याला नुकसान होण्याचा धोका असतो. या कारणास्तव, राहूची भीती दाखवून लोकांना ते थेट पाहण्यास मनाई केली असेल असे सिद्ध होते. सध्या अनेक प्रकारची साधने आहेत, ज्याद्वारे आपण सूर्यग्रहण बघू शकतो.

6) एखादया व्यक्तीचे अंत्यसंस्कार करून परत आल्यानंतर स्नान केले पाहिजे –
बर्‍याच अंशी याचे कारण वैज्ञानिक मानले जाते. काही दशकांपूर्वी कोणत्याही रोगासाठी लसीकरण नव्हते.

म्हणून या रोगाविरूद्ध सावधगिरी बाळगणे या दृष्टीने एखादी व्यक्ती काही रोग अथवा व्याधीने मरण पावला असेल तर त्याची लागण घरातली लहान मुले तसेच कुटुंबीयांना होऊ नये यासाठी अंत्य संस्कार करून आल्यावर आंघोळ करत. एवढेच नाही तर, कडुनिंबाची पाने देखील खात असत. जी रो-गप्र-तिकारक आणि किटानुंचा नाश करण्याचे काम करतात.

7) रात्रीच्या वेळी झाडाजवळ जाऊ नये –
वास्तविक, दिवसा ऑक्सिजन देणारी झाडे रात्री कार्बन-डाय-ऑक्साईड बाहेर टाकतात, जी आरोग्यास हानिकारक आहे. म्हणून रात्रीच्या वेळी झाडांजवळ जाण्याची मनाई असते.

8) नदीमध्ये किंवा एखादया तलावात पैसे टाकणे –
पूर्वी नदी हे पिण्याच्या पाण्याचे एकमेव साधन होते आणि नाणी (पैसै) देखील तांब्यापासून बनवले जात असत. जेव्हा तांबे जास्त काळ पाण्यात राहते तेव्हा त्यात असलेल्या सर्व किटानुंचा नाश करून पाणी निर्जंतुक बनते.

याच कारणास्तव ही परंपरा सुरू केली की तांब्याची नाणी पाण्यात टाकली पाहिजेत जेणेकरुन पाणी शुध्द होईल. हेच कारण आहे की आजही तांबे किंवा पितळाचे पात्र पूजेच्या कार्यात वापरले जातात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment