Wednesday, December 6, 2023
Homeआरोग्यपाणी पिण्याची योग्य पध्दत

पाणी पिण्याची योग्य पध्दत

पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करणं शक्य नाही. पाणी पिणे हे अनेक आ’जारांवरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे.

प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरो’ग्याला हानीकारक ठरु शकते. पाणी पिण्याच्या काही योग्य पद्धतींबद्दल जाणून घेऊ.

पावसाळ्यात, हिवाळ्यात पाण्याची श’रीराची गरज कमी असते. उन्हाळ्यात श’रीराची पाण्याची गरज वाढलेली असते. ते ओळखून आपले पाण्याचे प्रमाण ठरवावे. थंड देशात पाणी कमी प्यावे, उष्ण देशात पाणी जास्त प्यावे.

ए.सी.मध्ये काम असल्यास पाणी कमी प्यावे. दिवसभर फिरता व्यवसाय असल्यास, उन्हात अथवा उष्णतेच्या संपर्कातील काम असल्यास पाणी जास्त प्यावे. व्यायाम करणाऱ्यांनी व्यायाम झाल्या झाल्यावर लगेच जास्त पाणी पिऊ नये. त्यांना श’रीरातून घाम जास्त गेल्याने पाण्याची जास्त गरज असते. कमी व्यायाम करून जास्त पाणी पिऊ नये.

पाणी पिण्यास योग्य अशा काही पद्धती :-

  • मुळात आपल्या दिवसाची सुरुवात ही पाण्याबरोबर केली पाहिजे. आपण जितके जास्त पाणी प्याल तितके पिणे आवश्यक आहे. आणि आरो’ग्य दायी सुद्धा आहे. पाणी श’रिराला साफ करण्यास मदत करते. केवळ श’रीराची सफाईच करत नाही तर पाणी दिवसभर तुम्हाला ताजेतवाणे ठेवण्यास मदत करते.
  • पाणी एकदम पिणे योग्य नाही. घोट घोट असे पाणी हळू हळू प्यायला हवे.
  • जेवण केल्यानंतर कमीत कमी एक तासानंतर पाणी पिणे योग्य आहे. लगेच पाणी पिऊ नका. कारण आपल्याला काही स’मस्यांचा सामना करावा लागू शकतो. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे वि’ष समजले जाते.
  • कधीही उभं राहून पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमच्या घुडघ्यावर जोर पडतो. त्यामुळे अर्थराइटीस होण्याचा धो’का जास्त असतो.
  • तसेच फ्रिजमधील खूप थंड पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमची पचन क्रिया मंदावते. जास्त थंड पाणी पिण्याची सवय आरो’ग्यासाठी धो’कादायक आहे.
  • जेवण केल्यानंतर तोंड आणि गळा साफ केला पाहिजे. त्यासाठी १ ते २ घोट गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने श्वासातील दु’र्गंधी पसरण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स