आषाढी अमावस्या : दिप पूजनाच्या वेळी करा या मंत्राचा जप : घरातील इडा पिडा टळेल, लाभेल धनसंपदा आणि भरभराटी..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडा-पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्ज्वलित करून त्यांची पूजा करावी, अशी मान्यता आहे. या वर्षी दीप अमावस्या…

दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.

या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा.

आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडा-पिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्ज्वलित करून त्यांची पूजा करावी, अशी मान्यता आहे. लहान पणापासून आपण पाहत आलो आहोत रोज सायंकाळी देवापाशी, माठाजवळ, तुळशीपाशी दिवा लावण्याची पद्धत आहे. शहरांकडे आपली ही संस्कृती आता तशी क्वचित पाहायला मिळत असली तरी खेडेगावात अजुनही संध्याकाळी ही दिवे लावण्याची परंपरा कायम आहे. लहानपणीच आपल्याला हा श्लोक शिकवला जातो यातच दिवा लावण्याचे पुरेसे महत्व स्पष्ट होते.

दीप प्रज्वलनाचा श्लोक शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार | दिव्यला देखून नमस्कार || १ || तिळाचे तेल कापसाची वात | दिवा जळो मध्यान्हरात | दिवा लावला देवांपाशी | उजेड पडला तुळशीपाशीं | माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ || दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |

दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || 3 || अधिराजा महाराजा वनराज वनस्पती | इष्टदर्शनं इष्टानं शत्रूणां च पराभवम् | मुले तु ब्रह्मरुपाय मध्ये तु मध्यविष्णुरुपिण: | अग्रतः शिवरुपाय अश्वत्थाय नमो नमः ||

दीपपूजनाचा मंत्र दीपपूजन झाल्यानंतर, ‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥’,

असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी. याचा अर्थ असा की, हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे पूर्ण वर्षभर दीप पूजेची फलश्रुती प्राप्त होते. प्रत्येक कुटुंबीयांना सुख शांती समृद्धीच समाधान लाभ मिळावा, म्हणून दर महिन्याच्या अमावस्या पौर्णिमेला रात्री दीप पूजन अवश्य करावे, असे सांगितले जाते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment