आता गुगल मॅप बरोबर रेस मध्ये उतरतं आहे हे भारतीय बनावटीचं अॕप..

मॅप माय इंडिया हे नविन भारतीय बनावटीचं अॕप गुगल मॅपला टक्कर देण्यासाठी येत आहे खास भारतीय नेव्हीगेशन अॕप. ही नविन भारतीय अॕप वापरायला सध्या सगळीकडेच पसंती आहे. गुगल मॅप आणि गुगल अर्थला सध्यातरी कुठलाच पर्याय नाही. त्यासाठीच मॅपमायइंडिया या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

मॅपमायइंडिया ही नेव्हीगेशन उपलब्ध करून देणारी भारतीय कंपनी आहे. इस्रो (Indian Space Research Organisation) आणि मॅपमायइंडिया यांनी नुकतीच या सर्विससाठी हातमिळवणी केली आहे. इस्रोबरोबर संलग्न झाल्याने ही स्वदेशी नेव्हीगेशन सर्व्हिस कंपनी सॅटेलाइट बेस्ड सर्विस खास भारतीयांसाठी घेऊन येत आहे.

हे अत्याधुनिक अॕप लवकरच आपल्या सेवेसाठी सूरू करण्यात येईल असे मॅपमायइंडियाचे सीईओ रोहन वर्मा यांनी सांगितलं. ते म्हणाले की इस्रोकडून सॅटेलाईट इमेजेस उपलब्ध होतील आणि मॅपमायइंडियाकडून सर्विस दिली जाईल.

आत्मनिर्भर भारत अभियानात हे खूप महत्वाचे पाऊल ठरेल. परदेशी कंपन्या देत असलेले नेव्हीगेशन मोफत असल्याचा दावा करत असतील तरीही जाहिरातीतून पैसे मिळवतच असतात. शिवाय त्यातला डेटा सुरक्षितही नसतो. परंतु हे भारतीय अँप पूर्णपणे सुरक्षित असेल व मोफतही असेल.

हे अॕप बनवताना NavIC (Navigation with Indian Constellation)  आणि भुवन (Bhuvan) यांचीही मदत होणार आहे. NavIC ही सुद्धा एक भारतीय नेविगेशन सिस्टम आहे जिला इस्रोनेच तयार केले आहे. मॅपमायइंडिया १९९५ पासून डिजिटल मॅपिंगमध्ये कार्यरत आहे. ७.५ लाख गाव, ७५००पेक्षा जास्त शहरांचे रस्ते यात समाविष्ठ आहेत. जवळजवळ ३ कोटींपेक्षा जास्त ठिकाणांचे नकाशे यात असतील. भौगोलिक परिस्थिती जसे की पाऊस, वादळ,भूकंप, पूर अश्या गोष्टींचा अंदाज हे अॕप सांगेल. ही भारतीय सर्व्हिस जास्त अचूक माहिती सांगेल याची ग्वाहीही देण्यात येतेय.

गुगल मॅप वापरताना अनेक वेळा गोंधळ होत असतो. भारतीय रस्ते, त्यांची नावं आणि माहिती सहज समजत नाही. या सगळ्या गोष्टी सोप्या होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारतीयांना पाकिस्तानचा नेव्हीगेशन डेटा देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून असे भारतीय मॅपिंग सर्व्हिस बनवायचे प्रयत्न सुरू होते. या अॕप चा इंटरफेसही गुगल मॅप सारखा असेल व वापरायलाही सोपा असेल.

Leave a Comment