आठवड्याच्या या दिवसांमध्ये, या सर्व वस्तू खरेदी करणे मानले जाते अशुभ..!! येथे जाणून घ्या त्या वसतुंविषयी सविस्तर..!!

मित्रांनो, आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक काम करण्यासाठी काही खास आणि वेगवेगळे दिवस ठरवून दिलेले आहेत. असं म्हणतात जर एखादं काम योग्य दिवशी किंवा शुभ काळ बघून केले नाही तर त्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम हा होत असतो.

जसे एकीकडे एखादा शुभ दिवस बघून केलेली कोणतीही खरेदी किंवा काम यामुळे यश, आणि समृद्धी मिळते, तसेच दुसरीकडे एखाद्या अशुभ दिवशी केलेली खरेदी किंवा केलेल्या कामाचे नकारात्मक परिणाम बघायला मिळतात. म्हणून शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त बघून मगच कोणतीही खरेदी करावी. किंवा त्यापूर्वी एखाद्या नविन कामास सुरुवात करायला हवी.

परंतु याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे, की कुठल्या दिवशी आपण कोणती वस्तू खरेदी करावी किंवा करु नये. जेणेकरून त्या वस्तू संदर्भातील शुभ दिवस पाहिल्यानंतर मगच आपण वस्तू खरेदी करू शकाल.

वास्तु नियमानुसार असे काही दिवस आहेत ज्या दिवशी काही वस्तू खरेदी करण्यासाठी मनाई आहे. आता आपण येथे रविवार ते शनिवार या सर्व दिवसांत काय खरेदी करू नये याबद्दल जाणून घेणार आहोत.

रविवारी कोणती वस्तू खरेदी करायची नाही..?? वास्तुशास्त्रानुसार रविवार हा सूर्य या ग्रहाचा दिवस असल्या कारणाने, या दिवशी आपण कोणतीही लोखंडी वस्तू, फर्निचर, हार्डवेअर संबधित वस्तू, बागकामाच्या वस्तू, घर बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तसेच वाहनांचे कोणतेही स्पेअर पार्ट खरेदी करू नये, या सर्व वस्तूंसाठी हा दिवस अशुभ मानला जातो.

सोमवारी कोणती वस्तू खरेदी करु नये..?वास्तुशास्त्रानुसार सोमवार हा चंद्र या ग्रहाचा दिवस मानला जातो, या दिवशी वह्या-पुस्तके, धान्य, संगीत किंवा क्रीडा सं’बंधित वस्तू तसेच कलेसाठी म्हणून वापरात येणार्‍या वस्तू, कार, मोबाईल किंवा संगणक इत्यादी वस्तू या दिवशी खरेदी करु नयेत.

मंगळवारी कोणती वस्तू खरेदी करु नये..?वास्तुशास्त्रानुसार मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस मानला जातो. आपण या दिवशी पर्स, सेफ, सजावटीच्या वस्तू, शूज, लोखंडी वस्तू, फर्निचर आणि मोबाईल यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ नाही, म्हणून या दिवशी त्या खरेदी करण्याचे टाळावे.

बुधवारी कोणती वस्तू खरेदी करु नये..?वास्तुशास्त्रानुसार बुधवार हा वार बुध ग्रहाशी सं’बंधित वार आहे. या दिवशी भांडे, तांदूळ, औषधें, लाकूड, गॅस, यांसारख्या ज्वलनशील वस्तू एक्वेरियम इ. वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

गुरुवारी काय वस्तू खरेदी करु नये..?
वास्तुशास्त्रानुसार गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी डोळ्यांशी संबंधित कोणत्याही वस्तू, किंवा तीक्ष्ण वस्तू, भांडी आणि पाण्याशी संबंधित कोणतीही वस्तू या खरेदी करणे अशुभ मानले गेले आहे.

शुक्रवारी कोणती वस्तू खरेदी करु नये..?
वास्तुशास्त्रानुसार शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी मालमत्ता, स्वयंपाकघर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन तसेच पूजाविधी मध्ये वापरात येणाऱ्या वस्तू खरेदी करू नये, हे देखील अशुभ मानले जाते.

शनिवारी कोणती वस्तू खरेदी करु नये..??
वास्तुशास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवांचा दिवस मानला जातो, या दिवशी अन्नधान्य, मसाले, पर्स, कपाट, तीक्ष्ण वस्तू, मालमत्ता, स्वयंपाकघरातील वस्तू आणि लाल रंगाच्या कुठल्याही वस्तू खरेदी करू नयेत, या वस्तू शनिवारी खरेदी करणे अशुभ मानले जाते.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैरसमज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Comment