आयुर्वेद एक वरदान..

आयुर्वेदा बद्दल थोडेसे..

आपल्या संस्कृतीला आपल्या देशातील देव देवतांनी, आयुर्वेदाने आशीर्वादित केलेलं आहे, आयुर्वेद ज्या उपचार पद्धती ला यशस्वीरित्या ऋषी-मुनींनी आपल्याकडे हस्तांतरित केलं आहे आणि आपण आयुष्यात रोगराईपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपले जीवन वृद्धिंगत करण्यासाठी ही उपचार पद्धती नेहमी वापरत आलो आहोत, त्या आयुर्वेद उपचार पद्धती मधूनच इतर … उपचार पद्धतीचा उगम झाला आहे. अलोपॅथी आहे होमिओपॅथी आहे आयुर्वेदा पासून निर्माण झालेल्या अनेक पद्धती आहेत. हे सर्व दैवी वनस्पतीतून उद्भवलेले आहे, ऋषी-मुनिंनी आयुर्वेदाद्वारे चमत्कारीक औषधांवर संशोधन केले आणि तयार केले, ज्याद्वारे आपण आपले असाध्य रोगांचे निदान केलं आहे. आम्ही निरोगी व एक आनंदी आयुष्य जगत होतो.
परंतु आज आपण आपल्या संस्कृतीपासून .. या प्रभावी वनस्पतीपासून दूर पळत आहोत आणि याचा परिणाम असा आहे की आपण आज उद्भवणाऱ्या अनेक नविन आजारांपासून बरे झालो तर आहोत पण दुसरी व्याधी लगेच समोर तयार आहे.

याचे कारण आपण निसर्गापासून दूर आलो आहोत. आज भारतात आयुर्वेदाला जाणिवपूर्वक लपवून ठेवलं जातं किंवा दुर्लक्षित केलं जातं आहे. केवळ आपल्या भारतावर अशी निसर्गाची कृपादृष्टी आहे की ज्या हंगामात जो..जो.. आजार उद्भवतो, त्या..त्या.. ऋतूमध्ये देवाने त्याच रोगावरील औषधि आपल्याला प्रदान केली आहे.. जेणेकरून आपले पूर्वज स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगले आहेत. आणि आपल्या देशा व्यतिरिक्त या औषधी वनस्पती इतर कोठेही आढळत नाहीत. तरी देखील आपण सर्व लोकांइतकेच विकासाच्या नावाखाली आपला नाश ओढवून घेत आहोत.

जे निसर्गापासून दूर आहेत ते त्याचे दुष्परिणाम सहन करीत आहेत. पाश्चात्य सभ्यतेमुळे आपण आज खुप त्रस्त आहोत त्यांचं अनुकरण करत असतांनाच, आपण दिवसेंदिवस अनेक रोगाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत आणि आपल्या आयुर्वेदिक उपचार पद्धती मार्गापासून दूर जात आहोत आणि रोगाच्या महासागरात बुडत आहोत. आपली सकाळ इंग्रजी औषधांनी सुरू होते आणि हे औषधं रात्रीपर्यंत सुरू राहतात.
प्रत्येक वेळी एखाद्या नवीन आजाराची उत्पत्ती होते
आम्ही आपला दिनचर्या सोडून अनेक आजारांना मिठी मारत आहोत, म्हणून मी आता आणखी सांगू इच्छित नाही फक्त निसर्गाच्या सोबत या.. याच मार्गावर जाऊन आपण आरोग्य मिळवू शकतो. आयुर्वेद हा देव आहे, तो जीवन देणारा आहे, जर या वनस्पती नसतील तर सुदृढ जीवन मिळणार नाही. आयुर्वेदानुसार खा प्या आणि आनंद मिळवा. या अशा उपचार पद्धती आहेत जे वय वाढवतात.. पाश्चात्य संस्कृतीत फक्त दुःख आणि त्रास आहे आणि आपली संस्कृती नेहमी आनंद देणारी आणि आनंदी जीवन देत असते, तिचा आदर करा, आणि आनंदी रहा.

Leave a Comment