आयुष्यातील चांगला काळ सुरू होण्यापूर्वी बऱ्याच वेळा पू्र्व संकेत मिळू लागतात. या संकेतांच्या आधारे, आगामी काळात आपल्यासाठी काय चांगले होणार आहे हे आपण सहजपणे शोधू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही शुभ संकेतांबद्दल सांगणार आहोत.
जेव्हा आपल्याला हे संकेत मिळतात तेव्हा आपल्याला समजते की भविष्यात आपल्याबरोबर काही शुभ घडणार आहे. आणि बंद नशिबाचे दरवाजे लवकरच उघडणार आहेत.अचानक जर एखादी गाय आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ आली आणि हंबरुन आवाज देऊन लागली, तर समजून जा की आपले आता नशीब बदलणार आहे आणि आपल्याला अचानक पैसे मिळणार आहेत. घराबाहेर गायीचे असे अचानक येऊन हंबरणं हे लक्ष्मीच्या येण्याचे संकेत आहेत.
पाऊस सुरू असतांना अचानक आकाशात ढगांमधून सूर्यप्रकाश दिसणं हे लवकरच धनप्राप्तीच्या संकेतांचं लक्षण मानलं जातं.
घराच्या खिडकीच्या बाहेर हिरवळ दिसणं शुभ मानतात. या व्यतिरिक्त कोकीळ किंवा सोन चिरैया घरच्या छतावर किंवा घराबाहेर गात असेल तर ते येणाऱ्या पैशाचे संकेत आहेत.
सकाळी उठल्यावर मंदिराची घंटा, शंखनाद किंवा भजन-कीर्तन सारखे मधुर आवाज ऐकू आलेत तर ते आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे संकेत मानले जातात. शास्त्रवचनांनुसार गोड आवाज ऐकू येण्याचा अर्थ असा आहे की आपणास एखादी चांगली बातमी ऐकू येणार आहे.
रस्त्यात किंवा कोठेही एखादी नवविवाहित वधू शृंगार करुन नविन वस्त्र परिधान केलेली दिसली, तर घरात लवकरच एखाद्या लग्न कर्याचे ते संकेत आहेत.
सकाळी अचानक नारळाचे दर्शन होणे शुभ मानले जाते. सकाळी नारळ दिसणे हे साक्षात देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहेत.
जर एखादा पक्षी अचानक तुमच्या वर विष्ठा करतो तर हे शुभ चिन्हं म्हणून देखील गणले जाते. आणि असं मानतात की आपली वाईट वेळ आता संपली आहे आणि ही चांगल्या दिवसांची सुरुवात आहे.
कोठेही जाताना जर मांजरीने आपला मार्ग ओलांडला तर याचा अर्थ असा आहे की आपला प्रवास चांगला होईल आणि आपण ज्या कामासाठी जात आहात. तो यशस्वी होईल.
सकाळी सकाळी दुधाचे दर्शन करणे शुभ आहे. जर एखादी व्यक्ती सकाळी आपल्यासमोरुन दही किंवा दूध घेऊन जाताना दिसलं तर ते आपण प्रगती करत असल्याचे संकेत आहेत.
झोपेच्या वेळी जर एखादा पांढरा किंवा सोनेरी साप स्वप्नात दिसला असेल तर ते नशिब उघडण्याचे संकेत आहेत.
जर तुमच्या घरामध्ये वटवाघूळ आले तर हे अमाप संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे घराच्या छतावर घुबड पाहणे सुद्धा शुभ मानले जाते. वास्तविक घुबड हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
कासव हे सौभाग्याचे प्रतीक आहे. म्हणूनच जर आपल्याला अचानक कासव दिसलं तर समजून घ्या की आपले नशीब जवळजवळ उघडणार आहे. 13.तुटणारा तारा पाहताना मनात जे काही मागितलं ते सर्व काही खरे ठरते.
जर घराच्या प्रवेशद्वारावर हत्तींने आपली सोंड उंचावली असेल तर ते संपत्तीच्यख वाढीचे संकेत आहे.
चूकून उलटे कपडे परिधान करणे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात लवकरच आनंद आणि समृद्धी येणार आहे. जर वाटेत पडलेले पैसे सापडले तर याचा अर्थ असा आहे की आपले नशिब लवकरच चमकणार आहे.
सकाळी रस्त्यावर ऊस दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे.
घराच्या कुंपणाजवळ मोरांचे दर्शन झाल्यास आणि त्याने पंख पसरले तर हे देखील एखाद्या सुवार्तेचे लक्षण मानले जाते.
हातात खाज सुटणे हे संपत्तीच्या आगमनाचे संकेत दर्शवते.
जर स्वप्नात देवदर्शन झाले जर स्वप्नात तुम्हाला देव दिसले तर हे तुमचं नशीब उघडण्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे, स्वप्नात मंदिर किंवा देवाशी संबंधित कोणतीही गोष्ट दिसणे हे देखील शुभ मानले जाते.
चालत असताना अचानक एखादं फुल आपल्यावर पडलं तर आपल्याला लवकरच एखादी नवीन संधी मिळणार असल्याचे ते संकेत आहेत हे समजून घ्या.
ब्राह्मी मुहूर्ताच्या वेळी जर तुमचा डोळा अचानक उघडला तर हे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आपली सर्व अडकलेली कार्ये पूर्ण होणार असल्याचा तो संकेत आहे.
मोरांचा पंख कुठे पडलेला मिळाला तर आयुष्यात येणाऱ्या प्रेमाचे संकेत तो मोरपिस देऊन जातो.घरामध्ये सरड्याचे आगमन धन संपत्तीशी संबंधित असल्याचे दिसून येते.
टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.