30 वर्षानंतर होळीला शनि-गुरुचा अद्भुत योग, चार राशींना मिळणार या युतीचे पाठबळ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… होळी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकीच एक सण आहे. या दिवशी केलेल्या उपायांमुळे काही समस्या कायमच्या दूर होतात. तसे ग्रहांचं पाठबळही लाभते, ज्यामुळे या पाठबळाचा फायदा होतो.

30 वर्षानंतर होळीला पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण झाली आहे, काय सांगते तुमचे ग्रहमान वाचा.. फाल्गुन महिना सुरु झाला असून पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पौर्णिमा 6 मार्च असणार आहे. त्यामुळे हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार खास असणार आहे.

कारण 30 वर्षानंतर शनिदेव आपल्या स्वराशीत विराजमान झाले आहेत. तर 12 वर्षानंतर गुरु ग्रह आपली स्वरास असलेल्या मीन राशीत आहेत. या व्यतिरिक्त कुंभ राशीता त्रिग्रही योग तयार होत आहे.

कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध एकत्रित त्रिग्रही योग तयार करत आहे. जवळपास 30 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती तयार झाली आहे. यामुळे काही राशींना ग्रहांचं पाठबळ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत..

वृषभ रास – या राशीच्या जातकांना होळीच्या दिवशी तयार होणार ग्रहांचा योग फलदायी ठरणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील.

व्यवसाय करणाऱ्या लोकांना यावेळी फायदा दर्शवत आहे. तसेच नवीन करार या काळात निश्चित होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. तसेच मानसन्मानात वाढ होईल. असं असलं तरी एखादा निर्णय विचारपूर्वक घ्या.

मिथुन रास – या राशीच्या जातकांनाही ग्रहांचं पाठबळ मिळेल. ज्या कामात हात घालाल त्यात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

तसेच विदेशात नोकरी करणाऱ्या संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमचं आर्थिक गणित सुधारेल. तसेच जुनी देणी तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास – ग्रहांच्या अनोख्या युतीमुळे वाहन आणि घर खरेदीचं सुख दर्शवत आहे. या काळात तुमचं एखादं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. उद्योग धंदा करणाऱ्या जातकांना या काळात इच्छित लाभ होईल.

तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीसाठी ग्रहांची साथ मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून चांगला धनलाभ दर्शवतो. या काळात आरोग्यविषय समस्या जाणवतील त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या.

कुंभ रास – या रासीत सूर्य, शनि आणि बुध त्रिग्रही योग तयार करत आहेत. या दुर्लभ योगामुळे शुभ परिणाम दिसून येतील. कुंभ राशीला साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे.

असं असूनही या काळात आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. तसेच कुटुंबाकडून साथ मिळणार असल्याने कामात यश मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment