शास्त्रांनुसार आठवड्याच्या कोणत्या दिवशी कोणतं जेवण वर्ज्य आहे..??? ग्रहदोष निवारण उपाय..!!

ग्रह दोष दूर करण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या दिवशी या गोष्टी खाण्यामधून वर्ज्य कराव्या. असे केल्यामुळे आपल्याला होऊ शकतात आश्चर्यजनक फा-यदे..!!

ग्रह दोष निवारण करण्यासाठी प्रत्येक वारानुसार या गोष्टी वर्ज्य कराव्यात.

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्यासाठी नक्षत्र, तिथि आणि वार यांच्या स्थिती नुसार अनेक उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय केल्याने आपल्याला अनेक अडचणींवर मात करता येऊ शकते.

ज्योतिष शास्त्रातील ग्रहांच्या स्थितीनुसार आठवड्यातून सातही दिवशी कोणत्या सात गोष्टी अथवा व्यंजनांचे सेवन करू नये याची सुद्धा माहिती दिली आहे.

असे म्हणतात की जर आपण या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे सेवन केले नाही तर आपले आरोग्य कायम चांगले राहते आणि ग्रहांशी सं-बंधित निर्माण होणारे दोष देखील दूर होतात. तर चला आता बघूया आठवड्याच्या कोणत्या वाराला काय खाण्याचे टाळावे…!!!

सोमवार हा चंद्राला समर्पित दिवस मानला जातो. आणि साखर ही चंद्रांचं अन्न मानली जाते. म्हणून या दिवशी साखर खाऊ नये.

शास्त्र वचनांनुसार मंगळवारी तूप खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

बुधवारच्या दिवशी हिरव्या भाज्या खाऊ नयेत, पण या दिवशी हिरव्या भाज्या गरिबाना दान केल्या तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात.

दूध आणि केळी गुरुवारच्या दिवशी खाण्याचे टाळावे. त्या एकतर टाकून द्याव्यात. किंवा त्या केळी गोरगरीबांना दान तरी करुन द्याव्यात.

शुक्रवारच्या दिवशी आंबट वस्तुंचे सेवन करणे टाळावे. या दिवशी या वस्तु आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जात नाहीत.

शनिवार हा दिवस शनिदेव यांना समर्पित आहे म्हणून या दिवशी तेलात तळलेल्या किंवा तेलात बनवलेल्या गोष्टी खाण्याचे टाळावे. या दिवशी शनिदेवांना तेल अर्पण करावे किंवा तेल दान करावे.

रविवारच्या दिवशी मिठाचे सेवन करू नये. असे केल्याने अनेक गंभीर आ’जार बरे होऊ शकतात.

टिप – वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

Leave a Comment