अजा एकादशी, हे नियम पाळा : ही कामे करण्याचे टाळा नाहीतर होईल नुकसान..!!


नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते.

या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तर आता सप्टेंबर महिन्यात अनेक सण आलेले आहेत. अशातच या महिन्यात सर्वात महत्वाच्या दोन मोठ्या एकादशी आल्या आहेत. पहिली एकादशी आहे ती म्हणजे अजा एकादशी आणि दुसरी म्हणजे परिवर्तिनी एकादशी. चला तर मग जाणून घेऊयात या दोन एकादशीचे महत्त्व आणि तारीख.

शास्त्रांमधील काही उल्लेखानुसार भाद्रपद महिन्यात येणारी ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि अश्वमेध यज्ञाची फळे देणारी मानली जाते. असे मानले जाते की अजा एकादशीच्या उपवासाने पुत्रावर कोणताही संकट येत नाही आणि गरिबी दूर होते. दरम्यान अजा एकादशीचे व्रत आचरणे अत्यंत शुभ आणि पुण्याचे मानले गेले आहे. या व्रताची यशस्वी सांगता करणाऱ्यांना पुण्यफलप्राप्ती होते, असे सांगितले जाते.

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीला अजा एकादशीचा उपवास केला जातो. यावेळी हा उपवास ३ सप्टेंबर २०२१ रोजी उदयतीथीच्या मूल्यांसह केला जातो. तसेच भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. यंदा ही एकादशी १७ सप्टेंबर २०२१ रोजी आली आहे.

मित्रांनो आज जी ३ सप्टेंबर शुक्रवारी अजा एकादशी आली आहे. तसेच तिथी नुसार जर पहिले तर भाद्रपत महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी साजरी होते. आज आपण ह्या अजा एकादशी बद्दल आपण आज माहिती जाणून घेउयात.

मित्रांनो ह्या अजा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आराधना केल्याने आपल्या जीवनातील सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. त्या पापांतून मुक्ती तर होतेच शिवाय आपल्याला पुण्य प्राप्ती होते. मित्रांनो ह्या एकादशी दिवशी जर आपण व्रत करणार असाल तर चुकूनही ह्या दिवशी आपण तांदळाचे सेवन टाळावे.

या व्रतात आपण एकवेळ जेवण करू शकता परंतु त्या वेळेत आपण फलाहार करावा ह्या दिवशी तांदूळ खाणे वर्जित आहे. कारण शास्त्राच्या मान्यतेनुसार जर ह्या दिवशी आपण तांदळाचे सेवन केले तर आपल्याला पुढील जन्मात रंगणाऱ्या किड्यांचे जन्म येतो म्हणून ह्या दिवशी तांदळाचे सेवन करू नयेत.

मित्रांनो ह्या दिवशी विष्णूंची आराधना केल्याने आपल्याला जीवनामध्ये शुभ फळांची प्राप्ती होते खासकरून तुम्ही जर आर्थिक समस्यांमध्ये असाल किंवा सतत च्या अजरपणाची समस्या असेल तर हे आजारपनातून सुटका होते.

या दिवसाला फार मोठे महत्व आहे, ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या दान व ध्यान ह्या दोन्हीला खूप महत्व दिले जाते. ह्या दिवशी आपण खासकरून पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावीत. तसेच पिवळी फळे असतील किंवा त्या रंगाची डाळ किंवा इतर काही खाद्यपदार्थ असतील त्यांचे दान आपण ह्या दिवशी करावे.

या एकादशीला आपण घरात शंखनाद जरुर करावा. कारण शंख वाजवल्याने घरातील सर्व नाकारात्मक शक्ती निघून जाते. मित्रांनो ह्या दिवशी केल्या जाणाऱ्या वरील उपायांमुळे आपल्या घरातील सर्व आजारपण निघून जाते, तुमच्या मार्गातील आलेल्या सर्व समस्या दूर होतात.

मित्रांनो अशी मान्यता आहे की ह्या दिवशी रात्री झोपू नये ह्या रात्री जाग्रण करून श्री हरी विष्णूंचे ध्यान केले पाहिजे श्री हरी श्री विष्णूंची साधना उपासना, भजन, जप करावा. मित्रांनो ह्या दिवशी चुकूनही भांडण तंटे, वादविवाद करू नयेत. ह्या दिवशी तुळशीचे दान केल्यास आपल्याला सौभाग्य वृद्धीसाठी भगवंताकडून शुभआशीर्वाद मिळतात असे मानले जाते.

ह्या दिवशी दानधर्म केल्याने भगवान श्री हरी श्री विष्णूंची कृपा आपल्याला सैदव मिळत राहते. तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाची फळं फुलं अर्पण करावीत. ती श्री हरी श्री विष्णूंना खुपचं प्रिय वस्तुंपैकी एक आहेत.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!