Saturday, June 10, 2023
Homeअध्यात्मअक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कावळ्याला खाऊ घाला हा नैवेद्य., पितृदोष नाहीसा होऊन...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कावळ्याला खाऊ घाला हा नैवेद्य., पितृदोष नाहीसा होऊन येईल भरभराटी.

आजच्या दिवशी अक्षयतृतीया ही शुभ तिथि आली आहे अक्षय तृतीया ही साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी स्नान, दान, यज्ञ, पूजाविधी या सर्वांचं विशेष महत्व आहे. या दिवशी केलेलं कोणतंही शुभ काम हे अक्षय होते अर्थात त्याचं पुण्य कधीही क्षय होत नाही. तसेच या दिवशी सोनं खरेदी करणे देखील शुभ मानले गेले आहे.

या तिथीला केलेल्या कोणत्याही शुभ कार्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपत्ती यांचा प्रवेश होत असतो. भूमी पूजन, गृहप्रवेश, धार्मिक कार्य, विवाह या सारखी अनेक शुभ कार्य या काळात केली जातात. तथा अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते. या दिवशी जर आपण आपल्या पित्रांचे तर्पण केले तर अपणास पित्रांचे आशीर्वाद मिळतात.

तसेच आपल्या कुंडलीत पितृदोष असेल तर, आपल्या जीवनात अनेक समस्या असू शकतात. घरात पैसा न येणे,घरात सतत कलह होणेआणि घरात अशांततापूर्ण वातावरण असणे या सर्वांच्या मागे पितृदोष असू शकतो. जर तुमच्या कुंडलिमध्ये पितृदोष असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला यश मिळणार नाही. तेव्हा या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी. आपण अक्षयतृतीयाला एक विशिष्ट उपाय करायचा आहे जेणेकरून आपण ज्या कामास सुरुवात करु ते काम सफल होईल.

आपली प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये शांततापूर्ण वातावरण कायम बनून राहील. या मुळे घरातील व्यक्तींमधील कलह देखील कमी होतील. व्यवहारीक तथा इतर अडचणीही दूर होतील.

म्हणून आपल्याला एक करायचं आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान तथा इतर कामातून मोकळे झाल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा आपल्याला करावयाची आहे.

सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान व इतर प्रातविधि आवरुन. देवाला धूप दाखवून आरती करावी त्यानंतर आपण गोड नैवेद्य म्हणून खीर बनवायची आहे. एका वाटीमध्ये खीर घेऊन त्यामध्ये एक चपाती कुस्करून घालायची आहे. ते एकजीव करून आपल्या घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत जाऊन हा खीरेचा नैवेद्य आणि चपातीचा काला बनवून कावळ्याला खाऊ घालायचा आहे. जिथे कुठे तुम्हाला सोपं पडेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करायला काही हरकत नाही.

असे म्हणतात कि आपले पितृ कावळ्याच्या रूपात येऊन या कालावधीत हा भोग घेत असतात. त्यामुळे जर आपल्या कुंडलीत पितृदोष असेल तर आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी खीर आणि चपातीचा काला किंवा नैवेद्य आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे. जेणेकरून आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होईल, आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वांना प्राप्त होतील.

तुमचे पितर प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत. कष्ट आहेत ते दूर होतील. प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कमी मेहनतीमध्ये देखील तुम्हाला भरपूर लाभ तथा यश मिळेल. बऱ्याचदा काही लोकांना कमी कष्टांमध्ये सफलता मिळते. तर काही लोकांना खूप कष्ट करूनही त्यांना हवी तशी प्रगती होत नाही.

हे सर्व केवळ पितृदोशामुळे होऊ शकते आणि या पितृदोषाच्या निवारणासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी हा खास उपाय करायचा आहे. कावळ्याला खीर खाऊ घातल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परत याल तेंव्हा दक्षिण दिशेला उभ राहून आपल्याला धूप करायचं आहे. आणि या धूपमध्ये आपल्याला थोडीशी खीर टाकायची आहे.

हा धूप आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला हा धूप फिरवायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नेगेटिव्हिटी आहे. नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेने आपले घर भरलेले राहील. या उपायाने देखील आपला पितृदोष नष्ट होईल.

तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पितरांच्या नावाने थोडीशी खीर अवश्य ठेवा. यामुळे देखील आपले पितृ प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने गरजू व्यक्तीना आवश्यक वस्तूंचे दान जर तुम्ही केले तरी देखील पितृदोषातुन निवारण होते.

वर दिलेले सर्व उपाय आपल्याला पितरांच्या नावाने करायचे आहेत. जेणेकरून त्याच्या पुण्य प्रभावाने पितरांची मुक्ती होईल आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. तर अक्षयतृतीयेच्या दिवशी तुम्ही देखील हे उपाय अवश्य करा. यामुळे तुमची सर्व कामे सुरळीत पणे पार पडतील. कामामध्ये तुम्हाला काही अडथळे येणार नाहीत. आणि तुम्ही कोणत्याही कामामध्ये यशस्वी व्हाल.

टिप- इथे कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. या ठिकाणी शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर कुणी अंध श्रद्धा म्हणून करू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स