अखडलेल्या नसा मोकळ्या, शरीरात उत्साह नसणे, अपचन, गॅस, सांधेवात चक्कर थकवा या वरील घरगुती उपाय..!!

मित्रांनो अपचन, सांधेवात, अंग दुखी, कंबर दुखी, हात पाय दुखी, शरीरात उत्साह एनर्जी नसणे, चक्कर येणे यापासून घरच्या घरी बचाव करण्यासाठी घरगुती उपाय आज आपण येथे पाहणार आहोत.

बऱ्याच जणांना जॉईंट पेन च्या समस्या जाणवतात आणि उठल्यावर फ्रेश देखील वाटत नाही, म्हणजेच आराम करून सुद्धा तुम्हाला जर फ्रेश वाटत नसेल, शरीरात एनर्जी नसेल तर हे आपल्या शरीराला चांगले नाही वेळीच आपल्याला यावर उपचार केले पाहिजे.

कारण छोट्या छोट्या समस्यां पासूनच मोठे आजार उद्भवतात. जर असं तुमच्याबरोबर होत असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी एक ग्लास पाणी घ्यायच आहे आणि पाव चमचा ओवा हातावर घेऊन थोडा चोळून घ्या.

आणि त्या पाण्यामध्ये टाका. एक ताल पत्र देखील त्या पाण्यामध्ये टाकावे आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेऊन त्याचे साल काढून घ्यावे आणि ते आलं कुठून किंवा किसून त्या पाण्यामध्ये टाकावे. आणि ते पाणी मंद आचेवर चांगले उकळून घ्यावे.

एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी झाले पाहिजे इतपत ते उकळून घ्यावे. चवीसाठी तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करू शकता. साधारण एक इंच आलं घ्यायचा आहे. आल्या मध्ये विटामिन सी, फॉस्फरस, आयन, कॅल्शियम, झिंक, काॅपर, मॅग्नीज ही तत्व भरपूर प्रमाणात असतात.

आल्यामुळे वाताचे प्रॉब्लेम दूर होतात तसेच तेज पानमुळे सुद्धा हातापायाचे दुखणे दूर होते व तमालपत्र मुळे शरीरात एनर्जी आणि उत्साह निर्माण होतो. म्हणूनच हा काढा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतो.

आणि रोगामुळे पोटांचे विकार निघून जाता, हाडांना मजबुती मिळते व शरीर सुंदर व स्वस्थ राहण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी हा काढा घ्यावा आणि अर्ध्या तासानंतर रोजचे रुटीन केले किंवा चहा ऐवजी हा काढा पिला तर शरीरात एनर्जी आणि उत्साह तर टिकून राहीलच परंतु संधिवात, पोटांचे विकार, हात पायाचे दुखणे, पित्त अशा या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जातील.

आणि प्रथम तुम्ही आठ दिवस हा उपाय करा किंवा अधून मधून केलात तरी देखील चालेल. या उपायांमुळे कुठलाही साईड इफेक्ट न होता पूर्णपणे आपल्याला फायदा होतो.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. तरी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment