अक्षय तृतीयेला 50 वर्षांनी जुळून येत आहे दुर्मिळ संयोग.. जाणून घ्या पूजा कशी करावी.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी होणारी अक्षय्य तृतीया यावेळी 3 मे 2022 रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. ज्योतिषांच्या मते, 2022 ची अक्षय्य तृतीया मंगळ रोहिणी नक्षत्राच्या शुभ योगात साजरी होईल. सुमारे 50 वर्षांनंतर ग्रहांचा असा शुभ संयोग होत असल्याचे ज्योतिषी सांगतात.

याशिवाय 30 वर्षांनी अक्षय्य तृतीया अत्यंत शुभ योग येत आहे. हा दिवस ज्योतिष शास्त्रात खूप शुभ मानला गेला आहे. अशा या शुभ योगात स्नान आणि दान केल्याने आपली पुण्यप्राप्ती अनेक पटींनी वाढते असे सुद्धा अमनले गेले आहे.

अक्षय्य तृतीयेला ग्रहांची स्थिती

ज्योतिषीय गणनेनुसार, यावर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला सुमारे ५० वर्षांनी दोन ग्रह उच्च राशीत बसतील. त्याच वेळी, दोन ग्रह आहेत जे त्यांच्या राशीमध्ये उपस्थित असतील. उच्च राशीमध्ये दोन ग्रहणे आणि दोन ग्रहांचे स्वराशीत असणे यामुळे शुभ कार्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते.

अक्षय्य तृतीयेला चंद्र वृषभ राशीत असेल आणि शुक्र मीन राशीत असेल. तर शनी स्वराशी कुंभात विराजमान असेल आणि गुरु स्वराशी मीन राशीत असेल. ज्योतिषशास्त्रात अक्षय्य तृतीयेला चार ग्रहांची स्थिती उत्तम लाभाची शक्यता दर्शवते.   

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजेने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. नेहमीप्रमाणे प्रात:विधी उरकून पूजा करण्याचा संकल्प करावा. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतीके स्थापित करावीत. आणि दोन्ही देवतांचे मनोभावे आवाहन करावे.

पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद आणि कुंकू अर्पण करावे. उपलब्ध फुले अर्पण करावीत. तुळशीची पाने वाहावीत. धूप, दिवा, प्रसाद दाखवून आरती करावी. घरातील सदस्यांना प्रसाद वाटून देऊन पूजा संपवावी. या दिवशी जमेल तेवढे दान धर्म करावे. अक्षय्य तृतीयेला करण्यात आलेले मंत्रजप किंवा नामस्मरण केल्याने ते अखंड शाश्वत राहते, असे मानले जाते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!