अक्षय्य तृतीयेला अशाप्रकारे करा मिठाची पूजा… अपार धनसंपदा प्राप्त होईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. अक्षय्य तृतीया हा एक अतिशय शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा दिवस एखाद्या सणासारखाच साजरा केला पाहिजे आणि काही ठिकाणी तर हा दिवस कुठल्या सणाप्रमानेच साजरा केला जात असतो. ज्या प्रकारे दीपावलीला आपण दिवा लावतो, त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला देखील दारावर मातीचा दिवा लावून लक्ष्मीला अभिवादन करून तिच्या कृपेची प्रार्थना केली पाहिजे.

हिंदू संस्कृतीतील प्रत्येक पूजेमध्ये हंगामी फळे आणि फुलांचा समावेश केला जातो. सध्याचा हंगाम आणि सर्व फळांचा राजा आंबा हा आतापर्यंत बाजारात तसेच घराघरात दाखल झाला असेल  हे उपलब्ध नसेल तर पूजेत दुसरे काही फळ ठेवून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

त्या बरोबरच कापूस हे सुद्धा एका उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी थोडे सुती वस्त्र म्हणजेच कापसाचे वस्त्र देवाला परिधान करून किंवा कापसाचे आसन करून भगवंताची पूजा करावी. यामुळे घराची सुबत्ता चांगली होईल.

मीठ केवळ आहारशास्त्रातच नाही तर वास्तुशास्त्रातही खूप महत्त्वाचे मानले गेले आहे.आयुर्वेदाबरोबरच ज्योतिषशास्त्र सुद्धा मिठाचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे दिसून येते. मीठाशिवाय अन्न हे निरुपयोगी आहे. कारण ते योग्य प्रमाणात आहारात असलेच पाहिजे. परंतु तुम्हाला हे माहीत नसेल की संपत्तीसाठी सुद्धा या मीठाची पूजा केली जात असते. अक्षय्य तृतीयेला एका भांड्यात मीठ टाकून त्याची पूजा करावी.  समुद्रातून मीठ मिळते आणि लक्ष्मी ही सागराची कन्या असल्याने मिठाच्या पूजेने ती प्रसन्न होते असे मानले जाते.

तुळशीची पूजा केवळ सणासुदीतच नाही तर दैनंदिन जीवनातही केली जाते. तुळशीची पूजा आणि सेवन केल्याने उत्तम आरोग्य जीवन मिळते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडून आरोग्यवर्धक भेटवस्तू मिळणे याहून अधिक शुभ काय असू शकते? म्हणूनच तुळशीची व्यवस्थित आणि मनोभावे पूजा करून निरोगी आयुष्याची कामना करावी.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment