आळशीच्या सेवनाने वजन करा कमी.., आहेत इतरही अनेक लाभ..

तुम्हाला जर लवकर वजन कमी करायचं असेल तर आळशीच्या बियांना आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आळशीचं सेवन केल्याने कफसारख्या समस्येतून खूप लवकर सुटका मिळते. तसंच आळशी अत्यंत पौष्टिक समजण्यात येते.

आळशीच्या सेवनाने किंवा त्याचे पावडर करून शरीराला लावल्याने त्वचेला विलक्षण तेज येतं. महिलांच्या देखील बऱ्याच आरोग्याच्या समस्यांचं निदान आळशीच्या काढ्याने होते. आळशी मध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असल्याने मलावरोध च्या समस्येचं देखील निवारण होतं.

शरीराच्या कोणत्याही भागावर सूज असल्यास, तुम्ही आळशीच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. सूज लवकरात लवकर कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या घराता आळशीचं बी नेहमी असणं आवश्यक आहे.

आळशीमध्ये भरपूर प्रथिने असतात. आळशी आयुर्वेदिक दृष्टीने त्याच अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, परंतु यावर अमेरिकेत सुद्धा बरंच संशोधन झालं आहे. ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की – आळशीच्या बी आणि तेलामध्ये अल्फा लिनोलिक ऍसिड सापडतं, जे एक प्रकारे ओमेगा ३ फॅटी अँटी ऍसिड आहे.

या ऍसिड च महत्त्व डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक आळशी मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अँन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. त्याचबरोबर यामध्ये फायबर, विटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्निशियम, फॉस्फोरस, मँगनीज, आणि इतर महत्वाचे मिनरल्सचा देखील समावेश आहे.

हृदयरुग्णांसाठीसुद्धा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात. जवस कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. कर्करोग आणि अन्यही काही विकारांवर जवस उपयुक्त ठरते. जवसाची पूड चमचाभर घेऊन ती पाण्यात मिसळून सकाळी सकाळी प्राशन केली तर हे सारे गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात.

स्वयंपाक करताना खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावतो. आळशीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणांमुळे आळशी ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स गुणांनी त्वचेमध्ये कोलेजन प्रॉडक्शन आणि नव्या पेशींचं निर्माण होत असतं. यामुळे त्वचाही निरोगी राहाते.

बऱ्याचदा महिलांना हार्मोनल असंतुलनाची समस्या सतावत असते. आळशीमध्ये असणाऱ्या फायटोऍस्ट्रोजनच्या कारणामुळे महिलांसाठी हे खूपच फायदेशीर ठरतं.

मेनोपॉज च्या वेळी महिलांना बेचैनी, अत्यधिक गरम होणं, अनियमित रक्तस्राव, कंबरदुखी आणि सांधेदुखी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. हार्मोनचं संतुलन राखण्यासाठी आळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. तसंच तुमची मासिक पाळी नियमित करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

अभ्यासातून सिद्ध झालं आहे की कॅन्सर ची जोखीम कमी करण्यासाठी आळशीचं बी अत्यंत उपयुक्त आहे. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर याबरोबर लढण्यासाठी आळशीचं बी महत्त्वाचं समजलं जातं.

आळशीच्या बियांमध्ये लिगननचा स्तर अधिक प्रमाणात असतो. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर पासून संरक्षण होतं. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवलं जातं. आळशीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. या गुणांमुळे त्वचेवर होणारी जळजळ, सूज आणि लाल रॅशेस कमी करण्यासाठी मदत मिळते.

आळशी मध्ये वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं. आळशी हे प्रोटीनचादेखील एक चांगला स्रोत आहे आणि प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यास, भूक लवकर लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. आळशीच्या सेवनाने शरीर निरोगी राहातं आणि वजन कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो.

गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आळशी अतिशय फायदेशीर आहे. बऱ्याच घरांमध्ये गर्भवती महिलांसाठी अथवा नवजात बालकांच्या मातांसाठी आळशीचे लाडू बनवण्यात येतात.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आळशीचं सेवन योग्य नाही. पण तरीही बाळाला मिळणाऱ्या दुधासाठी आळशी चांगली समजली जाते आणि वर्षानुवर्ष याचा फायदाच महिलांना होतो हे समजण्यात आल्याने आळशीचा वापर केला जातो.

आळशीच्या बियांमध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण असतात. याचं सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रतिकारशक्ती अर्थात इम्युन सिस्टिममध्ये कमतरता असल्यास, आळशीच्या बियांचं सेवन करण्याचा त्या व्यक्तीला नक्कीच सल्ला घ्या.

आळशीच्या बियांचं सेवन केल्यास, तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येऊ शकते. आळशीच्या बियांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं.

Leave a Comment