अळूची पानं आहेत व्हिटॅमिन्स ने भरपूर..

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे !

पावसाळ्यात ताजी रानभाजी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. त्यापैकी अनेकांची आवडती रानभाजी म्हणजे अळू. अळूचे फदफदे, ऋषीपंचमीला केली जाणारी अळूची भाजी ते अगदी कुरकुरीत अळूवड्या अशा विविध स्वरूपात अळू आहारात घेतला जातो. नैसर्गिकरित्या अळूला खाज असल्याने त्याचा आहारात समावेश करणे आजकाल अनेकांना किचकटीचे वाटते. परंतू त्यामधील हे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतल्यास त्याची चव चाखण्याचा मोह तुम्हांलाही आवरता येणार नाही. म्हणूनच आहारतज्ञ कांचन पटवर्धन यांनी अळूचा आहारात समावेश करण्यामागील दिलेली ही ‘7’कारणं नक्की जाणून घ्या.

‘व्हिटॅमिन ए’चा मुबलक साठा-
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मुबलक प्रमाणात आढळते. सुमारे 100-200 ग्रॅम अळूमधून व्हिटॅमिन ए ची दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळूमध्ये 120 % ‘व्हिटॅमिन ए’ आढळते. यामुळे त्वचा सतेज होण्यास मदत होते.

‘व्हिटॅमिन सी’ चा पुरवठा होतो –
केवळ आंबट पदार्थांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आढळते हा समज दूर करून अळूचा आस्वाद घ्या. कारण अळूच्या पानांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ चा सुमारे 80% साठा असतो. त्याचा फायदा जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते. ‘व्हिटॅमिन सी’ची दैनंदिन आवश्यकता पूर्ण होईल अवघ्या 20 रुपयांत !

आयर्नची झीज भरून निघते
रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा ॲनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते. अळू प्रमाणेच कॅल्शियमचा पुरवठा करते

अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते

दृष्टी सुधारते
अळूच्या पानांच्या सेवनामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. तसेच डोळ्यातील शुष्कपणाच्या समस्येवर फायदेशीर ठरत मॉईश्चर सुधारते.
शरीरात वाढणारा ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस, फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक घातक आजारांपासून बचाव होतो.

अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. अळूचा आहारात समावेश कसा करावा ?
अळूच्या पानांमध्ये फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे हा अल्काईन स्वरूपाचा, थंड प्रवृत्तीचा आहे. यामुळे वजन घटवणाऱ्यांच्या, मधूमेहींच्या आहारात फायदेशीर ठरते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास अत्यंत फायदेशीर आहे.

अळूच्या पानांमधून केवळ फायबरचा पुरवठा होतो. परंतू त्याच्या सोबतीला डाळीचा समवेश केल्यास प्रोटीन्सचादेखील पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनते. अळूवडीतही बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतात.

परंतू अळूवडीचा उंडा वाफवल्यानंतर डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करून बनवल्यास अधिक आरोग्यदायी होतो. तसेच फोडणीला अतिप्रमाणात तीळ लावून विनाकारण फॅट्सचे प्रमाण वाढवू नका. अळूवडीप्रमाणेच त्याची पातळ भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पानं डाळीसोबत शिजवून त्याचा आहारात समावेश करा

अळूचा आहारात समावेश करताना कोणती काळजी घ्याल ??

अळूला नैसर्गिकरित्या खाज असल्याने तो स्वच्छ आणि नीट साफ करणे आवश्यक आहे. तसेच अळू अपुरा शिजवल्यास लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तो योग्यरित्या शिजवा. तसेच गाऊटच्या रुग्णांनी, युरिक ॲसिड अधिक प्रमाणात असलेल्यांनी अळू कमी खावा. तसेच काहींना अळूची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे अळूवर ताव मारण्याआधी त्याची ॲलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी.

ब्लड प्रेशर –
अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या होत नाही.

डोळ्यांची दृष्टी –
अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे अळूच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मांसपेशीही मजबूत होतात.

पोटाच्या समस्यांवर फायदेशीर –
तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.

सांधेदुखीवर गुणकारी –
तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.

वजन कमी करण्यासाठी –
अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.

अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.

दूध कमी येत असल्यास बाळंत्तिणी महिलेने अळूच्या पानांची भाजी खावी.

तापामुळे जीभेची चव जाते. त्यामुळे कोणतंच अन्न चवीष्ट लागत नाही. पण अळूच्या पानामुळे चव परत येते.

अळूची पाने शरिरात रक्त वाढवण्यास मदत करतात.

Leave a Comment