अमावस्येच्या दिवशी अशाप्रकारे करावे तुळशी पुजन, पितरांचे आशिर्वाद मिळतील तसेच धनसंपदा लाभेल..!!

मित्रांनो आपल्या सनातन धर्मात अमावस्या या तिथीला विशेष महत्त्वं दिलं आहे. आज ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येचा दिवस आहे, ज्या दिवसाला एक समस्यांचा किंवा वाईट दिवस म्हणून ओळखले जाते.

परंतु मित्रांनो, असे असूनही या दिवसाचे बरेचसे महत्त्व शास्त्रात सांगितलेले आहे. मान्यतेनुसार, या दिवशी चंद्र हा संपूर्णपणे अदृश्य होत असतो. म्हणूनच या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते.

अनेक लोक या दिवशी व्रत सुद्धा करतात. असे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी प्रामाणिकटणे आणि शुद्ध अंतःकरणाने उपासना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात.

दर्श अमावस्येचा मुहूर्त-
ज्येष्ठ, कृष्ण पक्ष, अमावस्या तिथि-
प्रारंभ – 01:57 प्रात, 09 जून
समाप्त – 04:22 दुपारी, 10 जून

धार्मिक ग्रंथानुसार, आपल्या देशात अमावस्याच्या, दिवशी अनेकजण उपवास, व्रत आणि विधिवत चंद्रदेवतेची पूजा करतात. या पद्धतीने चंद्राची पूजा केल्याने आपल्याला चंद्रदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.

आपल्या उपासनेने, चंद्र देवता प्रसन्न होऊन अनेक आशिर्वाद देतात तसेच भरभराटी साठी चंद्रदेवतांकडून आपल्याला सदिच्छा प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रदेवता हे भावना आणि दैवी कृपेचे स्वामी आहेत.

ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती अतिशय कमजोर असते अशा लोकांनी या दिवशी चंद्र देवांची मनोभावे पूजा करावी. पुराणा नुसार हा दिवस श्राद्ध अमावस्या या नावाने देखील ओळखला जातो.

आणि हेच कारण असते की या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते. जुन्या लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना अनेक आशीर्वाद देत असतात.

पूजेची पद्धत-
धनी पुराणानुसार अमावस्येच्या या दिवशी एखाद्या व्यक्तीने स्नान तथा दान करण्याची परंपरा देखील आहे. विशेषत: या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते.

परंतु जे लोक गंगा स्नान करण्यासाठी असमर्थ आहेत अशा भक्तांनी कोणत्याही नदीमध्ये, किंवा नदी तीरावर तसेच एखाद्या तलावामध्ये स्नान केले तरीही चालते.

याचबरोबर अमावस्येच्या या दिवशी भगवान शिवांची तसेच देवी पार्वती यांची आणि तुळशी मातेची पूजा देखील केली जाते, ज्यामुळे आपल्या घरातील आनंद आणि समृद्धी धनसंपदा वाढीस लागते.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment