आणि डॉ म्हणाले तुझ्या स्वामींनी तुझी प्रार्थना ऐकली बरं का..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ.. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमालेमध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्हीही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर या लेखाला नक्की शेअर करा. स्वामींच्या भक्तिमार्गाचे दिवे संपूर्ण जगात लागावे ही आपली सर्वांची कामना. श्री स्वामी समर्थ, यापुढील अनुभव हा सेवेकर्‍याच्या शब्दात.

मी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथे गेल्या पाच सहा वर्षापासून कामानिमित्त आहे, माझी आई ही स्वामींची सेवेकरी होती आणि तिच्यामुळेच मला ही गोडी लागली. आज मी नोकरी धंदा सांभाळून इथे जमेल तशी स्वामींची सेवा करत आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना स्वामी महाराजांच्या अनेक लिलांचा अनुभव आहे.

साधारणपणे दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला अंगदुखी, ताप खोकला झाला. मी ताबडतोब दवाखाना गाठला, कारण दिवस हे खूप भयानक चालू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी काही औषधे घेतली आणि पूर्ण आठवडाभर घरीच राहिलो. काही दिवसांनी मला थोडे बरे वाटायला लागले तेव्हा मी पुन्हा कामावर हजर झालो.

कामावर हजर होतो न होतो काही दिवसातच मला ताप आला. माझ्या कंपनीमधले काही लोक देखील आजारी होते. कंपनीमधे जेव्हा करुणाची टेस्ट केली तेव्हा असे आढळून आले की माझे 3 सहकारी जे माझ्यासोबतच एका घरात राहतात ते सगळे पॉजिटिव आहेत. मला काळजी लागली म्हणून मी देखील टेस्ट करून घेतली पण माझ्या सुदैवाने माझी टेस्ट नेगेटिव आली.

माझ्याच घरात राहणार्‍यांना करुणा आहे आणि मला नाहीये हे कसे शक्य ? म्हणून अजून 3 दिवसांनी मी पुन्हा एकदा टेस्ट करून घेतली. यावेळी माझा संशय खरा निघाला आणि माझा रिपोर्ट सकारात्मक आला. मनातून मी निराश झालो आणि आमच्या गावाकडे केंद्र चालवनार्‍या रमेश दादांना फोन केला.

रमेश दादांनी माझी खूप चांगली विचारपूस केली, मला म्हटले… स्वामी तुझ्या पाठीशी आहेत नितिन तू नीशंक रहा. त्यांनी मला काही सेवा दिल्या. रमेश दादांनी दिलेल्या सेवा मी न चुकता केल्या, सोबतच मी गुरुचरित्र वाचायला घेतले. घरापासून हजारो मैल दूर माझी काळजी घ्यायला आता फक्त स्वामीच होते आणि मी माझा सगळा भार त्यांच्यावर सोपवून मोकळा झालो.

इकडे पुन्हा एकदा माझी टेस्ट झाली पण रिपोर्ट यायच्या आधीच मला दवाखान्यात हलविण्यात आले होते. इथे मला संगितले गेले की तुम्हाला सीरियस इन्फेक्शन झाल्याचे निदर्शनात आले आहे आणि यापुढे तुम्ही बरे होईपर्यंत दवाखान्यात राहाल, घरी राहणे या परिस्थिती मधे बरोबर नाहीये.

दवाखान्यात भरती झालेले पाहून मी पुरता खचून गेलो होतो पण यावेळी देखील मी सेवा सोडली नाही. कारण फक्त माझे स्वामीच माझ्या सोबत इतक्या लांब दूरदेशात असू शकणार होते. मी डोळे घट्ट मिटले आणि स्वामींना प्रार्थना केली, स्वामी मला तुम्ही वाचवा. दवाखान्यात लोक मला सेवा करताना पाहून हसायचे पण मी काही मनावर घेतले नाही.

मला आजही तो दिवस आठवतो 4 जून, म्हणजे साधारणपणे दहा दिवसपूर्वी माझा करुणाचा रिपोर्ट निगेटिव आला आणि डॉक्टरांनी मला हसत येऊन संगितले ‘युअर स्वामी लिस्टनड यूअर प्रेयर’ (तुझ्या स्वामींनी ऐकले बर का तुझे..) मी पुर्णपणे बरा झालो. सातासमुद्रापार स्वामींनी मला तारले. माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या सोबत होते. ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला पण तुम्ही या अनुभवाच्या खाली 1001 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जाप केला तर हा अनुभव लिहल्याचे मला समाधान लाभेल आणि माझी सेवा स्वामी चरणी अर्पण होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment