नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात असलेला रोजच्या वापरातील तवा ही अतिशय महत्त्वाची अशी वस्तु आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या तव्याला खुप महत्व दिलेलं आहे. साधारणपणे घरातील गृहिणी तव्यावर दररोज पोळी किंवा भाकरी भाजत असते.
मित्रांनो हा तवा आणि एक स्वयंपाकासाठी वापरात येणारी कढाई हे दोन्हीही राहु आणि केतुचं या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतात. जर एखादी महिला या तवा आणि कढई यांचा चुकीचा वापर करत असेल तर यामुळे आपल्या सुखी आयुष्यात अनेक वास्तूदोष निर्माण होत असतात आणि यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होत असते किंवा घरामध्ये अनेक अडचणीं सुरु होतात.
तर मित्रांनो वास्तुनियमानुसार तवा कधीही पालथा ठेवू नये. म्हणजेच उलटा करून ठेवू नये. कारण तवा हा आपल्या घरात जेव्हा कुणीतरी मरण पावतं, त्याच वेळेस असा पालथा ठेवला जातो. म्हणून तवा कधीही पालथा ठेवू नये. पण जर आपणाकडून ही चुक पुन्हा पुन्हा घडली तर घरात अशांतता येते.
आपल्या सोबत आपल्या घरातील सदस्यांसोबत अशुभ घटना घडायला सुरुवात होते. तसेच आपल्या घरात जर गंज लागलेला तवा असेल आणि तो वापरत असेल तर ते त्वरित तो तवा वापरणे थांबावावे. कारण की या गंज लागलेल्या तव्याचे ते गंज असलेले अवशेष किंवा अंश आपल्या पोटामध्ये जातात.
यामुळे आपण आजारी पडतो. वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की ज्या पण घरात अशा प्रकारचा तवा वापरला जातो. त्या घराची प्रगती खुंटते व ते घर कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, तसेच हळूहळू त्याघरात गरीबी यायला सुरुवात होऊ लागते.
तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कढाई ही दोन्ही भांडी कधीही खरकटी ठेवू नये. यामुळे घरात आजारपण आणि गरीबी येते असते. त्यामुळे आपण तव्यावर कधीही खटकटं अन्न ठेवू नये. पण जर आपण आपल्या तव्याची, कढईची योग्य ती काळजी घेतली तर आपल्या घरातील धनसंपत्ती मध्ये सातत्याने वाढ होत जाते. तसेच समाजात आपली पत आणि प्रतिष्ठाही वाढते.
म्हणूनच आपले पूर्वज दररोज सकाळी आपल्या स्वयंपाक घरातील तव्यावर बनणारी पहिली भाकरी किंवा पोळी गौमाता ला देत असत. असे केल्यामुळे सर्व देवी – देवता आपल्यावर प्रसन्न होतील. यामुळे आपले सर्व पापंही धुतली जातील.
तसेच आपण बघतो की अनेक स्त्रियांना एक सवय असते की त्या नेहमी गरम तव्यावर पाणी टाकत असतात, पण त्यांच्या या अज्ञानामुळे घरातील लोकांमध्ये तंटा निर्माण होऊन अनेक अडचणी तयार होतात आणि आजारपण सुद्धा वाढते.
घरात तवा वापरत नसाल तेव्हा दृष्टीआड ठेवावा. तवा किंवा कढई कधीही उलटा ठेवू नये. जेवण तयार होत असलेल्या जागेच्या उजवीकडे तवा आणि कढई ठेवावी. जेवण तयार झाल्यावर रिकामी कढई किंवा तवा गॅसवर ठेवू नये. गरम तव्यावर पाणी टाकू नये.
यादरम्यान होणारा आवाजाने आपल्या जीवनात समस्या उद्भवू शकतात. तवा गार झाल्यावर तव्याला लिंबू आणि मिठाने घासावं, याने तवा चमकेल आणि आपले भाग्यही. तवा किंवा कढईला टोकदार वस्तूने खरडणे टाळावे. तवा किंवा कढईला उष्टं करू नये. किंवा तव्यावर, कढईमध्ये जेवू नये.
तर मित्रांनो, गृहनिंणो.. वरील पैकी आम्ही सांगितलेले हे सर्व नियम अवश्य पाळण्याचा प्रयत्न करा, जर तुम्ही या नियमांचं काटेकोर पणे पालन केले तर नक्कीच तुमच्या घरात सुख-शांति तथा भरभराटी नांदेल आणि घरात आजारपण ही येणार नाही. तसेच तुमचा उत्कर्ष व्हायला देखील वेळ लागणार नाही.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!