Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मअरे नशिबाला दोष काय देतोस.. तुझी कर्मच तर तुझं नशिब ठरवात..

अरे नशिबाला दोष काय देतोस.. तुझी कर्मच तर तुझं नशिब ठरवात..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. देव कधीच आपलं नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपलं नशीब लिहित असतात. निती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट असुच शकत नाही.

समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे. दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही.

माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृ’ त्यू पहात नाही. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.

जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो. जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.

जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे.

ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच… देतो.

तुझे हे चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. आणि आचरण तर त्या परमात्म्या पर्यंत घेऊन जाते.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.!!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स