बऱ्याचदा काही कपल्सच्या चेहऱ्यात इतकं साम्य असतं की लोक त्यांना भाऊ-बहीणच समजतात. साधारणतः आई-वडील आणि त्यांच्या मुलांचा चेहरा एकमेकांसारखा दिसणं सामान्य गोष्ट आहे. भावंडांचे चेहरेदेखील बऱ्याचदा एकमेकांसारखे दिसतात. अनेकवेळा इतर काही नातेवाईकांचे चेहरेही त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी इतके जुळतात की ते एकमेकांशी संबंधित आहेत, असं सहजपणे समजून जातं. पण तुम्ही कधी पती-पत्नीचा चेहराही एकमेकांसारखा असल्याचं पाहिलं आहे का? बऱ्याचदा कपलच्या चेहऱ्यांत इतकं साम्य असतं की लोक त्यांना भाऊ-बहीण समजतात. हे कसं घडू शकतं, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.
पती-पत्नीमध्ये रक्ताचं नातं नसलं तरी ते एकमेकांसारखे दिसतात. अनेक वेळा लग्न समारंभात लोक वधू-वराला पाहताच त्यांचे चेहरे एकमेकांसारखे दिसत असल्याचे सांगतात. हा केवळ योगायोग नसून, यामागे काही कारणं आहेत जी एका संशोधनातून समोर आली आहेत. ब्राइड साइड वेबसाइटच्या अहवालानुसार, चेहरा एकसारखा असण्यामागे अनेक कारणं असतात.
यात सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराची निवड करते, तेव्हा ती जाणूनबुजून किंवा नकळत अशाच व्यक्तीची निवड करते जी त्याच्या पालकांसारखीच असते. ज्याचे केस, डोळ्यांचा रंग, उंची, आवाज आदी गोष्टी त्याच्या पालकांसारख्या असतात अशा जोडीदाराशी ती व्यक्ती लगेच कनेक्ट होते.
1987 मध्ये झालेल्या एका संशोधनात असं आढळून आलं की, कपल एकाच वातावरणात राहतात, सारख्याच परिस्थितीला सामोरी जातात, सुख-दुःख, काळजी या गोष्टी एकत्रित वाटून घेतात, एकसारखंच अन्न खातात, त्यांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभावही सारखेच असतात. दोघांचा मेंदू एकमेकांच्या एक्स्प्रेशनची नक्कल करू लागतो आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांच्या प्रतिक्रियाही सारख्याच येऊ लागतात.
त्यामुळे चेहरा एकसारखा दिसू लागतो. अनेक कपल्सच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही एकाच प्रकारे पडू लागतात, असंही शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. आम्ही ज्या संशोधनाचा संदर्भ देत आहोत ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलं होतं. येथील शास्त्रज्ञांनी कपल्सच्या लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतर 25 वर्षांपर्यंतचे फोटो मिळवून त्यांच्या चेहऱ्यांची तुलना केली.
या संशोधनात 500 हून जास्त कपल्सचे फोटो होते. बऱ्याचदा व्यक्ती स्वतः सारखा चेहरा असलेल्या जोडीदाराकडे आकर्षित होतात. याला assortative mating म्हणतात. इतकंच नाही तर कपल्सची रोगप्रतिकारक शक्ती ही बऱ्याचदा एकसारखीच असते. या कारणामुळे जोडीदाराच्या आवडी-निवडी आणि जीवनशैलीतही खूप साम्य असते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!