Monday, May 29, 2023
Homeजरा हटकेअसा होतो दुधात पाणी घालून दूध विकणाऱ्याचा शेवट.!! बाळूमामाचा चमत्कार.!!

असा होतो दुधात पाणी घालून दूध विकणाऱ्याचा शेवट.!! बाळूमामाचा चमत्कार.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याा पेजवर..!! मित्रांनो एकदा बाळूमामा रूकडी ला लक्ष्मीबाईच्या घरी आले होते. त्यावेळी संत-महात्मे घरी आले यासाठी शेतकऱ्याने कुटुंबाने पुरणपोळी करण्याचा बेत आखला. सायंकाळची वेळ होती पुरण पोळी ला घ्यावे लागते.

बाळूमामा बापूंना म्हणाले आज बिन पाणी घातलेलं दुध आन. भाऊ नगरे हे गवळी कडे गेले. आणि गवळ्या ला बजावून सांगितले. आणि अख्खी दुधाची घागर घेऊन आले. घरी आल्यावर बाळूमामा नि म्हणलं या दुधात पाणी आहे काय?

त्यावर गवळी स्वतः म्हणाला दुधात एक थेंब पाणी नाही. जसं मिळलय तसं आणलय. त्याक्षणी बाळुमामा नी घागरीत भंडारा टाकला. त्याक्षणी चमत्कार झाला. गवळ्याने घातलेले पाणी घागरीच्या तळाला जमले. अस्सल दूध वर राहिले.

घागरातील दूध ओतून पाहता प्रथम दूध वेगळे आले. तळाचे पाणी मात्र शेवटी तळाला बाकी राहिले. त्याक्षणी बाळूमामा गवळ्याला म्हणाले. माणसाने माणसालाही देताना दुधात पाणी घालू नये.

आणि तू तर देवांना आणि भक्तांना ही दुधात पाणी मिसळून करून देतोस. आता तर प्रत्यक्ष दिलेस तुला तर या पापाचे प्रायश्चित भोगावे लागणारच. त्याअगोदर एक महिना संपण्यापूर्वीच तो गवळी मरण पावला.

वरील घटनेनंतर रूकडी, माणगाव, वडगाव, तोप संभापूर, खोची आणि आसपासची गावे बाळूमामा अतिशय निष्ठेने मानू लागली. त्यांची सेवा करू लागली. बापू शिंगारे यांच्या बहिणीला कुष्ठरोग झाला होता.

बाळूमामाना शिंगारे यांनी हात जोडून कळकळीची विनंती केली. बाळू कवडे माझे मेहुने आहेत. माझ्या बहिणीचा संसार वीसकटण्याची वेळ आली आहे. आपण कृपा करावे आम्हाला तुमच्या शिवाय कोणाचा आधार नाही.

दया करा, कृपा करा, क्षमा करा. मामांनी कृपावंत होऊन त्यास भंडारा खायला दिला. आणि बाळू कवडे यांचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. सर्वांना आनंद झाला. मामांचे नाव सर्वत्र पसरलं.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स