अशा बायका ज्या पण घरात असतात तिथे भिकारी सुद्धा बनतो राजा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला वाटते की लग्न करून जी स्त्री आपल्या घरला येईल ती भाग्यशाली असावी.

तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे. आपल्या घराची व आपल्या कुटुंबाची ती सदैव काळजी घ्यावी. व आपल्या जीवनात आनंद ही आनंद असावा. काही पुरुषांच्या बाबतीत हे खरेही होते.

त्यांच्या घरात येणारी स्त्री खरंच आनंद व भाग्य घेऊन येते. व घरातील संपूर्ण वातावरणात आनंद पसरवते. भविष्यपुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत. की ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात, ज्या स्त्रिया लग्न होऊन घरी जातात. त्या घराला स्वर्ग बनवितात.

त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री. जी स्त्री भगवंतांची व तुळशीचे पूजन करते, घरात देवाजवळ दिवा लावते, तुळशीजवळ दिवा लावते.

स्वयंपाक झाला की पहिला देवाला नैवेद्य देते मग सगळे भोजन करतात. त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र व शुद्ध होते. आणि अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते.

दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती. जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानते, जास्त हव्यास करत नाही. तिचा पतीही तिच्यावर आनंदी असतो. काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात यायलाच हवी असे वर्तन करतात.

यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाके नऊ येतात. व कधीकधी पत्नीच्या अवास्तव्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामातही गुंतावे लागते.

व त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागते. म्हणून जर स्त्री समाधानी असेल, तिच्या गरजा मर्यादित असतील तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाहीत. व घरातील वातावरण आनंदी व समाधानी असते.

तिसरे लक्षण म्हणजे स्त्री मध्ये धैर्य असावे, धाडस असावे. कशीही परिस्थिती आली तरी न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकत स्त्रीमध्ये असावी. व कितीही वाईट परिस्थिती आली असेल तर स्त्रीने आपल्या कुटुंबासोबत भक्कमपणे पाठीमागे उभी असेल तर वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. व त्यातूनही लवकरात लवकर मार्ग निघतात.

चौथा गुण म्हणजे राग न येणे, असा गुण स्त्रीमध्ये मिळणे अवघड आहे कारण राग येणे स्त्रीचा जन्मतः स्वभाव असतो. परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत.

थोडाफार राग सर्वच स्त्रियांना येतो. व तो यायलाच हवा नाहीतर त्या रागाचा आतल्या आत साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो. व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

जर स्त्री सारखी राग राग करत असेल, चिडचिड करत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते. व भांडणे आणि वाद विवाद होत राहतात. म्हणून स्त्री संयमी आणि शांत असावी.

समोरच्या व्यक्तीचे जर काही चुकत असेल तर त्याला नक्की विरोध करा. पण प्रत्येक बाबतीत चिडचिड करून घरातील वातावरण दूषित करू नका.

पुढील लक्षण म्हणजे समजदार स्त्री. जी स्त्री प्रत्येक गोष्टीत समजुतदारपणाने घेते, शांतपणे सर्व समजावून घेते. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते.

तसेच सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते ते घर सुखी व आनंदी असते. ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती स्त्री सर्वांशी बोलून आपले इतरांची चांगले संबंध निर्माण करते. मित्र-मैत्रिणी व शेजारी सर्वांनाच धरून ठेवते. व वेळ प्रसंगी ते सर्व तिच्या कुटुंबासाठी धावून येतात.

पण जी स्त्री कडू बोलते, वाईट बोलते ती सर्वांबरोबर आपले संबंध बिघडवून ठेवते. व वेळप्रसंगी तिच्या कुटुंबासाठी कोणीही धावून येत नाही. व तिचे कुटुंब अडचणीत येते. ज्या स्त्रीच्या तळ पायावर त्रिकोणाचा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते.

तसेच जास्तीचे तळपाय खोलगट असतात ती स्त्री आपल्या सोबत सर्व प्रकारची सुख व समृद्धी घेऊन येते. व आपल्या कुटुंबालाही सुख व समृद्धी मिळवून देते. ज्या स्त्रीचे डोळे हरणी सारखे असतात ती स्त्री खूप भाग्यशाली असते. व सर्वांना आनंद देते.

ज्या स्त्रीच्या बेंबी भोवती तीळ असते ती स्त्री आपल्या पतीला ऐश्वर्य व खूप धन मिळवून देते. ज्या स्त्रीच्या कपाळावर मधोमध तीळ असते ती स्त्री संपूर्ण घराला आनंद मिळवून देते. ज्या स्त्रीचे भाग्य खूप जोरदार असते त्यामुळे तिच्या कुटुंबाची कोणतीही कामे वेगाने पूर्ण होतात. व त्यात त्यांना यश मिळते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment