Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मअशा पद्धतीने शिव पार्वतीची आराधना करा.. आणि तुमचं खरं प्रेम मिळवा..

अशा पद्धतीने शिव पार्वतीची आराधना करा.. आणि तुमचं खरं प्रेम मिळवा..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मंडळी अनेक वर्षे झाली परंतु आजही शिवपार्वती यांचे एकमेकांवरील प्रेमाचे उदाहरण दिले जाते. तुम्हाला यासारखे खरे प्रेम मिळवायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक मोठी संधी मिळणार आहे.

या दिवशी प्रेमविवाहाची इच्छा असणारी जोडपी किंवा त्वरित लग्नाची इच्छा बाळगणारे तरुण तरुणी यांनी येथे वर्णन केलेल्या उपायांचा अवलंब केल्यास त्यांच्या इच्छा अतिशिघ्र पूर्ण होऊ शकतात. महादेवांच्या कृपाशीर्वादाने कल्याण होईल.

परंतु हे लक्षात ठेवा की जेव्हा त्यांच्या प्रति पूर्ण विश्वास आणि समर्पण असेल तेव्हाच हे उपाय यशस्वी होतात. चला तर मग जाणून घेऊयात या उपयांबद्दल. मित्रांनो यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे.

या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांवर विशेष आशीर्वाद देतात. शिवरात्रीच्या दिवशी भक्त आपल्या घरात समृद्धी राहण्यासाठी भगवान शिवाचे विविध उपाय करतात पण जर तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळवायचं असेल तर सर्वात प्रथम हा उपाय करा.

जर एखाद्यावर प्रेम असेल आणि त्याच्याशीच लग्न करायचं असेल किंवा तुमच्या लग्नाला उशीर झाला असेल तर यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अशा मंदिरात जावे जेथे शिवपार्वतीची मूर्ती शेजारी शेजारी आहेत.

यानंतर दोघांचीही संयुक्तपणे पूजा करावी. मग लाल रंगाचा दोरा घ्या पण लक्षात ठेवा की दोरा इतका मोठा असावा की त्याला हातात घेऊन शिवपार्वती भोवती सात वेळा प्रदक्षिणा घालता येईल. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी पार्वतीची प्रार्थना करा.

महाशिवरात्रीच्या दिवशी लाल पोशाख घालून मंदिरात जा. त्यानंतर माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू म्हणजेच लाल चुडा लाल ओढणी लाल कपड्यांची जोडी लाल फुलं मेहंदी लाल सिन्दुर 7 लाल रंगाच्या बांगड्या अर्पण करा.

तसेच अशी प्रार्थना करा की जसा तिला एक प्रेमळ जीवनसाथी मिळाला मलाही तसाच नवरा मिळू दे. यानंतर रामचरित्रातील विशेषत बालकांडात सांगितलेल्या शिवपार्वती विवाहशी संबंधित संदर्भ वाचा. पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना करा. यानंतर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स