मित्रांनो, ज्या माणसाचा स्वामींवर विश्वास नव्हता तरी देखील स्वामींनी त्याला म-रणापासून पासून का वाचवले..?? हे वाचून तुम्हीही नक्कीच म्हणाल जेथे विज्ञानाच्या सिमा संपतात तेथून स्वामींच्या अगाध शक्तींचा प्रांत हा सुरू होत असतो…
आजकाल विज्ञान आणि देव किंवा ईश्वरीय शक्ती या दोन्ही विषयांवर नेहमीच अनेकांची मतं मतांतरे आहेत. विज्ञान आणि ईश्वरीय शक्तीच्या या वादा संदर्भात असाच एक प्रसंग अक्कलकोट येथे फार पूर्वी घडला. तेव्हा स्वामी नेमके काय म्हणालेत? चला तर मित्रांनो, माहिती करून घेऊयात…
आपण बघतो की विज्ञान आणि देव किंवा ईश्वरीय शक्ती या दोन मुद्यांवर नेहमीच अनेकांचे डिबेट होत असतात. विज्ञानवादी आणि बुद्धीवादी असलेले लोक दैव, ईश्वरीयशक्ती या अशा गोष्टी काही केल्या मानत नाहीत. अशा गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वासच नसतो. ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध होत नाहीत, त्या गोष्टींचे अस्तित्व विज्ञानवादी अधीही मानत नाहीत. मित्रांनो, देव आहे किंवा नाही, हा एक मोठा वाद आहे.
यासंदर्भात जागोजागी मतांतरे पाहायला मिळतात. तेच दुसरीकडे, विज्ञानाचे मत काही असले, तरी देव, ईश्वरीय शक्ती आहे, असे मानणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे. कोट्यवधी श्रद्धाळू दररोज कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती, नामस्मरण, आराधना, जप, उपासना करीत असतात. तर मित्रांनो, विज्ञान आणि ईश्वरीय शक्तीच्या वादासंदर्भात असाच एक प्रसंग अक्कलकोट येथे घडला.
अक्कलकोट या गावात गोविंद नावाचा एक अभियंता (इंजिनियर) राहत होता. तो अगदी कर्तव्यनिष्ठ होता. मात्र, ईश्वरीय शक्ती, देव या सर्वांना तो मनात नव्हता. त्याच्या लेखी कर्तव्य हेच सर्वश्रेष्ठ आणि सर्वकाही होते. दुसरीकडे, त्याची आई आणि पत्नी धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि निस्सीम स्वामीभक्त होत्या. कितीही कोणी समजावले, तरी ईश्वरशक्ती आणि भक्ती गोविंदला मान्य नव्हत्या.
एकदा या गोविंद च्या गावात म्हणजेच अक्कलकोट येथे सर्वानुमते विहीर बांधण्याचे ठरते. विहिरीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात गोविंदला निमंत्रित केले जाते. एक उत्तम अभियंता म्हणून गोविंदाला भूमिपूजन सोहळ्याचा मानकरी ठरवले जाते. मात्र, भूमिपूजन कार्यक्रम वगैरे गोष्टी ढोंग आहेत, असे त्याचे मत असल्या कारणाने, ऐन कार्यक्रमाच्या वेळी, तेथील भूमिपूजनापूर्वी गोविंद स्वतः कुदळ घेऊन जमीन खणायला जातो.
मात्र, कुदळ उचलून घाव घालणार तेवढ्यात गोविंदच्या छातीत तीव्र कळ येते आणि त्याच्या हातातील कुदळ खाली पडते. लोक गोविंदला तातडीने वैद्यबुवांकडे घेऊन जातात. गोविंदला हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान वैद्यबुवा करतात. आणि जेमतेमच दोन ते तीन दिवसच गोविंद सर्वांचा सोबती असल्याचे वैद्यबुवा सांगतात. इकडे गोविंद अंथरुणात खिळून शेवटच्या घटका मोजत असतो.
एक दिवशी भुजंग नावाची व्यक्ती गोविंदच्या घरी येते. तेव्हा भुजंग गोविंदच्या नातेवाईकांना सांगितात की या गावी कीर्तन करायला आलो होते, तेव्हा स्वामींनी दृष्टांत दिला. गोविंदला घरी जाऊन निरोप देऊन या की, त्याचा रोग ललित स्तोत्र वाचल्याने बरा होईल. पण गोविंदचा या सगळ्यावर विश्वास नसल्यामुळे त्याने स्वामी वचन फेटाळून लावले.
पण घरच्या मंडळीनी गयावया करून गोविंदला स्वामींची आज्ञा पाळण्यासाठी तयार केले. कुटुंबाच्या आग्रहामुळे, इच्छा नसतानाही गोविंदने ललितास्तोत्र वाचले. पुढे यानंतर दोन दिवसांनी वैद्यबुवा पुन्हा एकदा गोविंदची प्रकृती पाहण्यासाठी आले. तेव्हा गोविंद ठणठणीत असल्याचे निदान वैद्यांनी केले. गोविंद एकदम अचंबित आणि थक्क झाला. स्वामी वचनाच्या महतीचा त्याला प्रत्यय आला होता.
मग यानंतर गोविंद आणि त्याचे स्वकीय आणि कुटुंबीय स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेथे जाऊन गोविंद स्वामींना महणतो माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता. स्वामी.. तरी आपण माझे प्रा-ण वाचवलेत. यावर स्वामी समर्थ गोविंद ला म्हणाले, ”अरे! तुझा लाख विश्वास नव्हता, पण तुझ्या कुटुंबाचा होता ना. तुझ्या साठी नव्हे आम्हाला आमच्या भक्तांसाठी तुला बरे करावेच लागले.
हे बघ विज्ञानावर विश्वास ठेवणे चांगले आहे. मात्र, विज्ञानाच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे, असे मानने. ही चुकीचे आहे. जिथे विज्ञान संपते, तेथूनच ईश्वरीय शक्तीचा प्रांत सुरू होत असतो. एक लक्षात ठेव, तुझे विज्ञानही ईश्वरानेच घडवले आहे. तुम्हा शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते. अगदी तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्यांना तुमच्यासारख्या ईश्वरीयशक्ती न मानणाऱ्यांची कीव येते.”
मित्रांनो, या लेखाबद्दल तुमची सर्वांचीच प्रतिक्रिया आमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करुन आणि आपल्या इतर मित्र आणि मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की आम्हाला कळवा..!!