बापरे..!! या महाशयांनी तर चक्क संसद भवन विकायला काढले..होते..!!

नमस्ते मित्रांनो, आपली आजची कहाणी आहे मि. नटवरलाल याची म्हणजेच ‘ठग ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका महान ठगाची, मिथिलेशकुमार श्रीवास्तव उर्फ ​​नटवरलाल, उर्फ …इत्यादी.. जो की मुळचा बिहारचा होता, ज्याने संसद भवन, ताजमहाल आणि लाल किल्ला देखिल विकला होता..!! ते पण एकदा नाही दोनदा … चला तर मग आज या नटवरलाल नावाच्या ठगाची कथा जाणून घेऊया.

नटवरलाल कोण आहे?

मिथलेश कुमार श्रीवास्तव उर्फ ​​नटवरलाल यांचा जन्म 1912 मध्ये बिहारच्या सिवान जिल्ह्यातील बांग्रा गावात झाला होता. तो एक ठग होता ज्यांमुळे त्यांच्या गावाला देखिल मोठा अभिमान आहे की त्याचा जन्म त्यांच्या गावात झाला आहे.

नटवरलाल यांनी आपल्या हयातीत शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आणि त्याच्याकडे 50 हून अधिक बनावट नावे होती. तो अगदी लिलया प्रसिद्ध लोकांच्या बनावट स्वाक्षर्‍या करायचा आणि हे करण्यात तो तज्ज्ञ होता.

त्याने बड्या.. बड्या.. उद्योगपतींना लुटले होते ज्यात टाटा, बिर्ला आणि अंबानी यांची नावं देखील आहेत.

आपली ऐतिहासिक मालमत्ता परदेशात विकली

सरकारी अधिकारी बनून नटवरलाल यांनी ताजमहालला दोनदा, लाल किल्ल्याला, एकदा राष्ट्रपती भवनाला आणि एकदा संसद भवनाला आणि नंतर जेव्हा सर्व खासदार त्या इमारतीत होते तेव्हा परदेशी लोकांना या ऐतिहासिक वास्तू विकल्या होत्या.

या जागा विकायला आवश्यक असणार्‍या कागदपत्रांवर नटवरलाल यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या बनावट स्वाक्षर्‍या सुद्धा केलेल्या आणि परदेशी लोकांकडून अनेकदा पैसेही उकळले होते.

या नटवरलाल चा प्रवास 1000 रुपयांच्या चोरी पासून
सुरु झाला होता.

एका या अहवालानुसार, दिल्ली पोलिसांच्या फाइलमध्ये मिथिलेश कुमारची 50 हून अधिक नावे आहेत, त्या काळात त्याने 1000 रुपयांची पहिली चोरी केली होती. त्याने त्याच्या शेजाऱ्याच्या बनावट सहीने बँकेतून पैसे काढले होते.

नटवरलाल याचं कौशल्य असं होतं की तो एका दृष्टीक्षेपात कोणाच्याही सहीची नक्कल करायचा. असे म्हटले जाते की एका प्रसंगी नटवरलाल यांने देशातील पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्वाक्षरी देखील त्यांच्यासमोर ठेवली होती, आणि त्यामुळे डॉ. राजेंद्र प्रसाद खूप आश्चर्यचकित झाले होते.

हे महाशय 90 च्या दशकांपासून आहेत गायब.

सुमारे 90 च्या दशकापासून नटवरलालचा पत्ता लागलेला नाही.पण 2009 मध्ये जेव्हा नटवरलाल यांच्या वकिलाने त्यांच्यावर दाखल केलेले 100 खटले काढून टाकण्यासाठी याचिका दाखल केली असता नटवरलाल याचा भाऊ गंगाराम यांने 1996 साली म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते.

नटवरलाल यांचे नावं आता एक रुढ असलेला वाक्प्रचार बनले आहे, जे प्रत्येक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा ठग असणाऱ्या व्यक्तींसाठी उदाहरण म्हणून वापरलं जातं. आठ राज्यांत 100 पेक्षा जास्त खटल्यांमध्ये त्याच्याविरुद्ध घेतलेल्या निर्णयांनुसार त्यांना 113 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Leave a Comment