Thursday, June 8, 2023
Homeबॉलिवूडबालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्ला याचे हृदय वि'काराच्या झटक्याने नि'धन..!!

बालिका वधू फेम सिद्धार्थ शुक्ला याचे हृदय वि’काराच्या झटक्याने नि’धन..!!

मुसाफिर की तरह चला जाता है कोई रहगुजर को तनहा करके..!! बिग बॉस सिझन 13 विनर अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

मनाला अगदी चटका लावून जाणारा हा प्रसंग अनेकांना एक प्रकारचा मानसिक धक्का देऊन गेला. काल कपूर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.

माध्यमातून असे समजते की सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्या अगोदर काही औषधं घेतलीत. या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळीच हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या नंतर डॉक्टरांनी त्याला मृ*त घोषित केले.

डॉ नी असे सांगितले की सिध्दार्थ चे रात्री हार्ट अटॅकने निधन झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धार्थ बिग बॉस सीझनचा विजेता होता.

साधारणपणे 80 च्या दशकात 12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत अशोक शुक्ला आणि रीता शुक्ला यांच्याकडे जन्मलेल्या सिद्धार्थच्या कुटुंबाची मुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराज (पूर्वी अलाहाबाद) येथे आहेत. त्यांनी सेंट झेवियर्स हायस्कूल, फोर्टमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर रचना संसद स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईनमधून इंटिरियर डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली होती.

सिद्धार्थ हा “बालिका वधू” आणि “दिल से दिल तक” सारख्या डेली सोप मधील भूमिकांमध्ये झळकत होता. अतिशय लोकप्रिय असा ओळखला जाणारा सिद्धार्थच्या अचानक जाण्याने सिरियल इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

तो “झलक दिखला जा 6”, “फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी” आणि “बिग बॉस 13” सारख्या शोमध्ये त्याच्या रंगछटांसाठी लोकप्रिय आहे

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी येताच, अनेक सेलिब्रिटीजनी तसेच त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर शोकसंदेश पोस्ट केलेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स