बाप्पांना नैवेद्य दाखवू नका : मनोभावे अर्पण करा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! सणावाराला आपण जेव्हा पण काही गोडधोड जेवण बनवतो त्यावेळी देवाला नैवेद्य देत असतो तेव्हा आपण सहजपणे उच्चारत की, देवाला नैवेद्य दाखवला.!

उद्या जर भगवंताने तुम्हाला सुख फक्त “दाखवलं” तर काय? आणि मुळातच त्यांच्या कृपेने जे मिळालंय ते घेऊन आपण त्यांनाच देतोय तर तेव्हा ते भगवंताना दाखवण्यापुरतंच तरी नसावं, नाही का?

मग हा नैवेद्य कसा अर्पण करावा..?
आता गणेशोत्सव सुरु होणार आहे तर बाप्पासाठी नानाविविध भोग आणि नैवेद्य म्हणून बनविले जातात. पण मित्रांनो आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे अन्न आहे.

जे आपण खाणार त्याच अन्नाचा नैवेद्य देखील असावा. एरवी कोणी तोंडही लावणार नाही अशी बाजारातली पाच फळे देण्यापेक्षा घरात जे जे उत्तम अस बनवाल तेच नैवेद्य म्हणून ठेवा, आण फळंच हवीत असं मुळीच नाही ना.

तसेच नैवैद्य भगवंतांच्या, बाप्पांच्या समोर ठेवण्यापूर्वी बिनधास्त तो स्वयंपाक चाखून बघा, चुकून जर अळणी किंवा खारट असेल तर देवाने तसंच खायचं का? ( हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे. असे करायला हवेच असे बिलकुल नाही )

आता हे नैवेद्यासाठीचं जे ताट आहे त्यात सगळं एकदम वाढायला घेऊ नका, तर घरातल्या व्यक्तीला वाढतो तसंच वाढा आणि तेवढंच वाढा. आता समोर बसून त्याला विचारा, बाप्पा, आवडलं का रे? बघा, तो होच म्हणणार.

दोन मिनिटांनी परत गरम तव्यावरील पोळी वाढा, आग्रह करा की एवढे मोदक संपवलेच पाहिजेत बाप्पा तू ! मधून मधून पेल्यात तांब्यातून पाणी ओतून प्यायला द्या. शेवटी वाफाळलेला भाताची मूद वाढून त्यावर गरम वरण, आणि साजूक तूप वाढा. स्वतः लिंबाची फोड पिळा, बघा हं, चुकून बी तर नाही न पडली !

मग विचारा, बाप्पा पोट भरलं का रे, घेऊ का पान ? आणि मगच बाप्पां समोरील पान उचलून घ्या. ओलसर रुमालाने हलकेच बाप्पांचा उजवा हात आणि ओठ टिपून घ्या. असेल तर तांबूल पण द्या, किंवा स्वीट डिश म्हणून मस्त आईस्क्रीम सुद्धा !

आता दिवे आणि रोषणाई थोडी मंद करून बाप्पाला थोडी विश्रांती घेऊ द्या, तोवर आपली जेवणं होतील.

पानातल्या मेव्यापेक्षा मनातल्या भावनांचा भावाचा भुकेले आहेत आपले बाप्पा ! त्यांना त्या दहा दिवसांत एकदा तरी असा जेवायचा आग्रह नक्की करून बघा, आणि मग पहा, आनंदाचे कितीतरी “मोद”क बाप्पांकडून आपल्यालाच परत मिळतील ते!

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment