Monday, May 29, 2023
Homeआरोग्यबेस्ट इम्युनिटी बुस्टर: असा बनवा घरच्या घरी स्पेशल मालेगाव पॅटर्न काढा..!!

बेस्ट इम्युनिटी बुस्टर: असा बनवा घरच्या घरी स्पेशल मालेगाव पॅटर्न काढा..!!

मित्रांनो मी तुम्हाला एक काढा सांगणार आहे तो घेतल्यानंतर तुमची प्रतिकारशक्ती वाढेल तर हा काढा करण्यासाठी लागणारे साहित्य चहा च्या पानाचे तुकडे, 3 लवंग, दोन मोठे गुळाची खडे. एक मोठा आल्याचा तुकडा. तुळशीची पाने, मिरी, सुंठ पावडर,वेलची पूड, एक चमचा हळद आणि दालचिनी.

तीन लवंग चेचून बारीक करून घ्या. त्यामध्ये दालचिनी टाकून ती सुद्धा बारीक करून घ्या. त्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर टाका. एक चमचा मिरी टाका. एक चमचा वेलदोडा टाका. व ते खलबत्ते च्या साह्याने बारीक करून घ्या.

व ते बारीक झाल्यावर त्यामध्ये आल्याचा तुकडा टाका. तेसुद्धा खलबत्ते च्या साह्याने बारीक करून घ्या. व त्यानंतर गवती चहा ची पाने टाका. आणि त्यामध्ये तुळशीची दहा पाने टाका. व ती चांगल्या प्रकारे खलबत्त्यात बारीक करून घ्या.

ते बारीक झालेले मिश्रण एका प्लेटमध्ये घ्या. काढा तयार करण्यासाठी तुम्हाला एक पातील लागणार आहे. व त्या पातेल्यात एक ग्लास पाणी टाकायचा आहे. व ते मिश्रण त्या पातेल्यात टाकायचा आहे. व त्यामध्ये गुळाचे दोन खडे टाका.

व एक चमचा हळद टाका. व ते मिश्रण दहा मिनिटांसाठी गॅसवर उकळायला ठेवायचा आहे. दहा मिनिटानंतर तो काढा सोधून एका ग्लासमध्ये घ्यायचा आहे. हा तयार होईल काढा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवा.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊ शकता.

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स