भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी फक्त ‘हा’ गुण आत्मसात करा, यशस्वी व्हाल, सुखी व्हाल, ऐश्वर्य लाभेल

मित्रांनो भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी फक्त हा एक गुण आत्मसात करा तुम्ही आयुष्यात यशस्वी बनाल, सुखी व्हाल, ऐश्वर्य लाभेल.

मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की, भगवान महादेवांना देवांचा देव महादेव म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला कोणत्याच अपेक्षा, लोभ नाही तोच व्यक्ती महादेव असू शकतो.

मनुष्याला कामाच्या बदल्यात मोबदला हवा असतो. देवांचे देव महादेव ते आहेत जे कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. ते नेहमी लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात. प्रत्येकाच्या अडचणीला उभे राहत असतात.

देवाची उपासना :
जेव्हा समुद्र मंथनात विष बाहेर आले तेव्हा कोणतेही देव – राक्षस व मानव ते स्वीकारण्यास पुढे आले नाही. फक्त आपले श्री भोले शंकर ते विष स्वीकारण्यास पुढे आले.

त्यांनी कोणताही विलंब केला नाही. की कोणत्याही दैत्याला अथवा देवाला पुढे येण्यास सांगितले नाही. त्यांनी ते विष शंकराने प्राशन केले.मात्र त्यांनी ते विष शरीरात पसरू दिलं नाही आपल्या कंठात विष धारण करून ते निळकंठ बनले.

फक्त बेल पत्र, धतुरा त्यांनी संतुष्ट होऊन जगाच्या कल्याणासाठी त्यांनी विष स्वीकारले आणि म्हणून ते महादेव झाले. भगवान राम शंकराची उपासना करतात व शंकर भगवान रामाची.

माहितीसाठी एक उदाहरण –
मित्रांनो, महाभारतातील एक प्रसंग येथे सांगत आहे, श्रीकृष्णानं पांडवांचा विजय व्हावा यासाठी शंकराची आराधना करून अर्जुनाला पाशुपतास्त्र मिळवून दिलं.

श्रीराम यांनीही रामेश्वरची स्थापना करून पूजा केली आहे. याच ताप्तर्य म्हणजे, ज्याच्या कडे काहीच नाहीये, तो व्यक्ती पार्शिवेश्वरचीही पूजा करू शकतो. जो समृध्द आहे तो स्पटिकाच्या शिवलिंगाची पूजा करू शकतो. जे संन्यासी आहेत ते मानस पूजा करून शंकराला प्रसन्न करतात. त्यांनी दाखवून दिली.

देवांचे देव –
महादेव गरिब, श्रीमंत, राजा सगळ्यांचे आराध्य आहेत. त्यांची ऋषी, संत, राम, कृष्ण आणि गणपतीदेखील महादेवाची उपासना करतात. म्हणूनच शिव देवांचे देव आहेत. आयुष्यात जेवढं मिळतय त्यात समाधानी राहा.

वस्तू सगळ्यांसोबत वाटून घेण्यात आनंद आहे. यज्ञ, तप, आणि दान यांपासून कधीच दूर राहू नका. भगवान फक्त मुक्ति मिळवण्याचा मार्ग नाहीये. ते स्वतः हिमालयात बसून तप करतात. जप करणं हा श्रेष्ठ यज्ञ आहे.

ज्यांना तो मिळालाय ते तो सगळ्यांसोबत वाटून आनंद व्यक्त करत आहेत. म्हणूनच यज्ञ, तप आणि दान या त्रिमूर्तीचं दर्शन भगवान शंकरांमध्ये होतं. हे आपण वाचलं किंवा ऐकलं असेल.

मृगचर्म, साप, भस्म हे महादेवाचे साथी आहेत. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. अनेक देवता, भक्त त्यांच्या कृपेची याचना करतात. त्यांची स्वतःची कोणतीच इच्छा नाहीये.

ते मात्र फक्त एक बेलपत्र समर्पित केल्यानंतर प्रसन्न होतात. ते आत्माराम आहेत. ते भौतिक सुखात रमत नाहीत. सर्वानाच मृत्यूची भीती आहे. पण ते मृत्यूची भीती समुळ नष्ट करणारे देव आहेत.

मित्रांनो महादेवांचा केवळ हा एकच गुण जरी आपण आत्मसात आणला तरी आपले कोणतेही कार्य चुटकीसरशी पूर्ण होईल.

भगवान महादेव हे दयाळू आहेत त्यांना आर्त विनवणी घाला ते तुमच्या मदतीला सदैव धावून येतील. आणि आपल्या कुठल्याही अडचणी पाहता पाहता दूर होतील.

वरील माहिती वेगवेगळ्या स्रोतातून एकत्रित करण्यात आली आहे. याचा कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.

Leave a Comment