मित्रांनो, आजकाल अनेक क्षेत्रांत भेसळ हा प्रकार सर्रास सुरु आहे. आणि अशा भेसळयुक्त आहाराच्या सेवनाने आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसे तर आजकाल बऱ्याच वस्तुंमध्ये भेसळ ही होतच असते. पण मित्रांनो, आपल्या वेज मेनू मध्ये एक वस्तु नेहमी वापरली जाते ती म्हणजे पनीर..
मित्रांनो, हे पनीर जर कधी पारंपरिक पद्धतीने तयार झालेलं असेल तर अतिशय उत्तम, पण जर हे पनीर जर कधी भेसळयुक्त असेल तर ते वापरणे किंवा खाणे आपल्या साठी अतिशय धोकादायक ठरु शकते. म्हणून आज आम्ही तुमच्या साठी पारंपरिक पद्धतीने बनलेलं पनीर कसे ओळखावे या बद्दल माहिती घेऊन आलो आहे
नमस्ते मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे आपण बनावटी असलेल्या आणि खऱ्या पनीरमधील फरक सहज ओळखू शकाल..!!
मित्रांनो, असे क्वचितच कुणीतरी असेल ज्याला पनीर खायला सहसा आवडत नाही. जेव्हा कधी आपल्या घरामध्ये एखादा विशेष कार्यक्रम असतो तेव्हा आपल्याला व्हेज मेनू मध्ये काहीतरी चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. तेव्हा एकच पदार्थ आठवतो तो म्हणजे पनीर..
पनीर हे आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. त्यात लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे श-रीराला आवश्यक पोषण मिळते. पनीर च्या सेवनामुळे श-रीरामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविण्यात देखील मदत होते. तसेच पनीर तुमचे हृदय सुद्धा निरोगी ठेवते.
जरी पनीर गुणधर्मांची खाण आहे असे आपण समजतो, परंतु जर त्यात भेसळ केलेली असेल तर फायद्याऐवजी ते श-रीराला बर्याच हानी पोहचवू शकते. तसेही, आजकाल बाजारामध्ये सर्वच गोष्टी भेसळयुक्त येत आहेत.
पोलिसांनी अशा ठिकाणांवर लाखो छापे टाकूनही या भेसळ माफियांवर योग्य तो अंकूश बसत नाही. मित्रांनो, अशा परिस्थितीत, या लेखाद्वारे आम्ही आपल्याला अशा काही टिप्स देणार आहोत ज्याद्वारे आपण आपल्या कुटुंबाला व स्वतःलाही या बनावट पनीर पासून सहज वाचवू शकतात. चला तर आता काही महत्त्वाच्या टिप्स बघूयात –
हाताने कुस्करून तपासून पहा –
जेव्हा आपण पनीर विकत घेण्यासाठी बाजारात जाता तेव्हा खरेदी करण्यापूर्वी आपल्या हातांनी मॅश करुन खात्री करुन घ्यावी. बनावट पनीर स्किम्ड दुधाच्या पावडरपासून बनविले जाते ज्यामुळे ते हातांचा दबावामुळे सहज तुटते.
जेव्हा ते आपण कुस्करतो तेव्हा पनीर हाताने मॅश केल्यावरही तो खाली पडत असेल तर पनीर बनावट आहे हे आपण समजून घ्यावे. स्किम्ड दुधाच्या पावडरपासून बनविलेले पनीर खाणे आपल्या पाचन तंत्राला हानी पोहोचवू शकते तसेच त्यामुळे आपले पोट देखील बिघडू शकते.
आयोडीन टिंचर पासुन करा नकली पनीर ची ओळख –
आपण विकत आणलेले पनीर खरे आहे की बनावटी आहे हे आपल्याला ओळखायचे असल्यास आपण यासाठी आयोडीन टिंचर चा वापर करता येऊ शकतो. सर्वात आधी बाजारातून आणलेले पनीर एका पॅनमध्ये काढून ठेवा आणि त्यात पाणी घाला. आता हे 5 ते 7 मिनिटे उकळून घ्या आणि नंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर या पनीरमध्ये आयोडीन टिंचर टाका. जर आपल्या पनीरचा रंग निळा झाला आहे तर ते पनीर बनावटी आहे.
वास्तविक पनीर अगदी मऊ आणि लुसलुशीत असते –
मित्रांनो, जेव्हा आपण बाजारातून पनीर विकत आणता तेव्हा ते अगदी रबरसारखे नसेल याची काळजी घ्या. बनावट पनीरची ओळख म्हणजे ते अगदी रबरा सारखं असते आणि खात असतांना तोंडात खेचल्यासारखं वाटू लागते.
असली पनीर मुळातच इतकं टणक किंवा कठीण नसतं. आपण विकत घेत आहोत ते पनीर मऊ वाटत असल्यास, पनीर शुद्ध आणि असली आहे हे समजून घ्या.
सोयाबीन किंवा तुरदाळ डाळीच्या पावडर पासून तपासून घ्या –
पनीर चे परिक्षण करण्यासाठी ते पाण्यात टाकून थोडा वेळ उकळवून घ्या. ते थोडं थंड झाल्यावर सोयाबीन किंवा तूर डाळची पावडर त्यावर घाला आणि 10 मिनिटा साठी तसेच सोडून द्या. जर 10 मिनिटांनंतर या पनीरचा रंग हलकासा लाल होऊ लागला असेल, तर तुमचं पनीर बनावटी आहे.
या लाल रंगाचा अर्थ असा आहे की नकली पनीर हे डिटर्जंट किंवा युरियापासून बनविले गेले आहे. आणि मित्रांनो, या दोन्ही गोष्टी आपल्या श-रीरासाठी अतिशय धोकादायक आहेत. आपण अश्या बनावटी वस्तु खाण्याचे टाळायला हवे.
मित्रांनो, या लेखात नमूद केलेल्या काही सोप्या टिप्सचे अनुसरण करून आपण खऱ्या आणि बनावटी पनीरची अगदी सहजच ओळख किंवा पारख करु शकतात. या टिप्स बनावटी पनीरमुळे होणाऱ्या नुकसानी पासून आपल्या आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकतात.
मित्रांनो, आपल्याला हा लेख आवडला असेल, तर फेसबुकवर नक्कीच शेअर करा, आणि असे लेख पुन्हा वाचण्यासाठी आमच्या वेबसाइट रॉयल कारभार शी कनेक्ट रहा…!!!