नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, शिवशंकरांचा महिमा अगाध आहे. पृथ्वीतलावर देवतांचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे सध्याच्या काळातही पाहायला मिळतात. ज्यांना पाहून लोक फक्त आदराने नतमस्तक होतात. पुरातत्व शास्त्रज्ञांनीही त्यांच्यापुढे हार मानली.
येथे आम्ही भारतातील विविध क्षेत्रांमध्ये स्थापित अशा 6 रहस्यमय मंदिरांबद्दल सांगणार आहोत. त्या मंदिरात असलेल्या रहस्यांचा उलगडा आजतागायत कोणीही करू शकले नाही. शिव शंभूची लीला त्यांनाच ठाऊक… चला तर मग जाणुन घेऊ या अजब गजब मंदिरांचे रहस्य
1) गढमुक्तेश्वर शिव मंदिर – गढमुक्तेश्वर येथील प्राचीन गंगा मंदिराचे रहस्य आजपर्यंत समजू शकलेले नाही. दरवर्षी मंदिरात असलेल्या शिवलिंगावर कोंब फुटतात. जेव्हा ते फुटते, तेव्हा भगवान शिवसह इतर देवी देवतांच्या आकृतींचे त्यात दर्शन होते. या विषयावर बरेच संशोधन कार्य देखील करण्यात आले, परंतु आजपर्यंत शिवलिंगावरील अंकुराचे रहस्य कोणालाही समजू शकले नाही.
एवढेच नाही तर जर मंदिराच्या पायऱ्यांवर दगड फेकला गेला तर पाण्यात दगड मारल्यासारखा आवाज ऐकू येतो. मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श करून जणू गंगा वाहते की काय असे भासते. हे कोणत्या कारणामुळे घडते, हे आजपर्यंत कोणालाही कळू शकले नाही.
2) ओडिसासारख्या उष्ण वातावरण असलेल्या ठिकाणचे अतिथंड असलेले शिव मंदिर –
टिटलागढ हा ओडिसाचा सर्वात उष्ण प्रदेश मानला जातो. या ठिकाणी एक कुंम्हडा नावाच्या डोंगरावर हे अनोखे शिवमंदिर स्थापित आहे. खडकाळ प्रदेशामुळे येथे प्रचंड उष्णता असते.
पण मंदिरात अतिशय थंड वातावरण असते. उष्णतेचा या मंदिरावर कोणताही परिणाम होत नाही. इथे एसी पेक्षा जास्त गारवा जाणवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, येथे कडक उन्हामुळे भाविकांना मंदिराच्या परिसराबाहेर ५ मिनिटेही उभे राहणे कठीण होते पण मंदिराच्या आत पाऊल टाकताच थंडगार वातावरण जाणवू लागते.
मात्र, हे वातावरण केवळ मंदिर परिसरापर्यंतच राहते. बाहेर येताच उन्हाची तीव्रता तुम्हाला त्रास देऊ लागते. असे अजब आहे हे मंदिर, शिवजींचीच महिमा अजुन काय…. हा चमत्कार कसा घडतो ह्याचे गुपित अजुन कोणीच शोधु शकले नाही.
3) ऐरावतेश्वर शिव मंदिर जेथे ऐकू येते मधुर संगीत –
ऐरावतेश्वर मंदिर’ 12 व्या शतकात तामिळनाडूतील चोल राजांनी बांधले होते. हे एक अतिशय अद्भुत मंदिर आहे. येथील पायऱ्यांवर पाऊल ठेवले तरी कानात संगीत गुंजत असल्याचे ऐकू येते. हे मंदिर अतिशय खास वास्तुशैलीत बांधले गेले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदीराच्या तीन पायऱ्या.
ज्यावर हलके पाऊल ठेवले तरी संगीताचे वेगवेगळे स्वर ऐकू येतात. पण या संगीतामागचे रहस्य काय आहे? हे अजुनही कळले नाही. हे मंदिर भोलेनाथांना समर्पित आहे. मंदिराच्या स्थापनेसंबंधी स्थानिक दंतकथांनुसार, देवांचा राजा इंद्राचा पांढरा हत्ती ऐरावत याठिकाणी शिवाची पूजा करत असे.
यामुळे या मंदिराचे नाव ऐरावतेश्वर मंदिर असे पडले. मृत्यूची देवता यमराज यांना ऋषींनी शाप दिला होता आणि त्यामुळे जळजळीत देह घेऊन ते या मंदिरात आले आणि आवारात बनवलेल्या पवित्र कुंडात स्नान करून भोलेनाथांची पूजा केली.
त्यानंतर ते पूर्णपणे निरोगी झाले होते. याच कारणामुळे मंदिरात यमाची प्रतिमाही कोरलेली आहे. हे एक जागृत देवस्थान मानले जाते. हजारो भाविक येथे दर्शनास येत असतात. युनेस्कोने हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
4) बोधेश्वर महादेव मंदिर – बांगरमऊ हे उन्नाव शहराच्या दक्षिणेस कटरा-बिल्हौर मार्गावर स्थित आहे, ज्याठिकाणी बोधेश्वर महादेव मंदिर आहे. याबद्दल एक अद्भुत कथा आहे. पंचमुखी शिवलिंग, नंदी आणि नवग्रह यांची स्थापना स्थापन याठिकाणी करण्यासाठी स्वतः महादेवांनी त्या राजाला दृष्टांत देवून बोध केला होता. अशी आख्यायिका आहे.
यामुळे मंदिराचे नाव बोधेश्वर महादेव मंदिर असे पडले. असे म्हटले जाते की जेव्हा राजाचे शिपाई शिव, नंदी आणि नवग्रहांना रथावर घेऊन जात होते, तेव्हा रथ या राजधानीत प्रवेश करताच जमिनीत बुडू लागला. यानंतर अथक प्रयत्न झाले पण रथ बाहेर येऊ शकला नाही. मग राजाने सर्व मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्याचे आदेश दिले.
तेव्हापासून भक्त बोधेश्वर मंदिरात असाध्य रोगांच्या निवारणासाठी येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शिवलिंगाला पवित्र मनाने स्पर्श केल्याने भक्तांचे आजार बरे होतात. एवढेच नव्हे तर या पंचमुखी शिवलिंग असलेल्या मंदिरात मध्यरात्री 12 साप पंचमुखी शिवलिंगाला स्पर्श करण्यासाठी येतात. मग ते परत जंगलात निघून जातात. असे म्हटले जाते की आजपर्यंत या सापांनी कोणत्याही स्थानिक नागरिकाला ईजा पोहोचवलेली नाही.
5) तामिळनाडूमधील बृहदिश्र्वर मंदिर – तामिळनाडू मध्ये स्थित बृहदीश्वर मंदिर देखील आश्चर्यकारक आहे. येथे स्थापन केलेले शिवलिंग एकाच
दगडापासून बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारात नंदीची मूर्ती स्थापन केलेली आहे. नंदीची मूर्ती सुद्धा त्याच दगडाची आहे.
या मंदिराची वास्तू अतिशय नेत्रदीपक आहे. येथे दिवे बंद केल्यानंतरही भक्त शिवलिंग पाहू शकतात. यामागचे कारण म्हणजे इथे सूर्यप्रकाश थेट नंदीवर पडतो त्याचवेळी त्याचे प्रतिबिंब थेट शिवलिंगावर पडते आणि अशा प्रकारे शिवलिंग स्पष्टपणे दृश्यमान होते.
6) छत्तीसगढचे भुतेश्वर शिवमंदिर – छत्तीसगडच्या मरोडा गावात भोलेनाथचे अद्भुत मंदिर आहे. या मंदिराचे नाव भूतेश्वर मंदिर आहे. मंदिरात स्थापित शिवलिंगाचा आकार दररोज 6 ते 8 इंचांनी वाढतो. या शिवलिंगावर नैसर्गिक जललहरी देखील दृश्यमान आहे. जे हळू हळू जमिनीच्या वर येत आहे.
हे ठिकाण भूतेश्वरनाथ भाकुरा महादेव म्हणून ओळखले जाते. असेही मानले जाते की भगवान शंकर-पार्वती ऋषींच्या आश्रमांना भेट देण्यासाठी आले होते, तेव्हाच त्यांची स्थापना शिवलिंगाच्या रूपात झाली.
या भूतेश्वर नाथ शिवलिंगाचे नाव पुराणात देखील घेतलेले आहे. जिथे ते भाकुरा महादेव म्हणून ओळखले जाते. शिवकालीन हे अद्भुत शिवलिंग पाहण्यासाठी येथे नेहमी गर्दी असते, परंतु श्रावण महिन्यात भक्तजन जास्त प्रमाणात येथे दर्शनास येतात.
अशा या अद्भुत आणि चमत्कारी शिवमंदिरात महादेव साक्षात् वास करतात असे मानले जाते. आजही असंख्य भाविक श्रद्धेने या मंदिरात दर्शनास येतात आणि त्यांना शिवजींचे आशीर्वाद नक्किच लाभतात. आपणही अशा रहस्यमयी शिवमंदीरांना भेट द्या आणि आपले जीवन आनंदमय सुखमय बनवा. ॐ नमः शिवाय..!!
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!