बिनधास्त आणि निर्लज्ज होऊन करा या 3 गोष्टी : कधीच लाजू नका : नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आचार्य चाणक्य हे जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक व्यक्ती होऊन गेले. मित्रांनो आचार्य चाणक्यांनी जी चाणक्यनीति सांगितली ती आजच्या काळात सुद्धा अगदी तंतोतंत लागू पडते.

चाणक्य म्हणतात की माणसाने या तीन प्रसंगी कधी लाजू नये. अगदी निर्लज्ज होऊन आपली कामे आपण करावी. असे कोणते तीन प्रसंग आहेत की माणसाने लाजू नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

माणसाच्या अंगी अनेक भाव असतात. मानवाला कधी भीती वाटते तर कधी दुःख होतं कधी हसू येतं तर कधी आश्चर्य वाटतं कधी कधी असे प्रसंग येतात की आपण लाजतो. आपल्याला लाज वाटते.

मित्रांनो असे प्रसंग तुमच्या जीवनात सुद्धा आलेले असतील मात्र चाणक्य म्हणतात की असे तीन प्रसंग आहेत या तीन प्रसंगी आपण चुकूनही लाजू नये.जर आपण लाजलात लाज बाळगली तर नुकसान हे आपलंच होतं.

दुसऱ्याचा विचार न करता असल्या प्रसंगी आपण स्वार्थी बनवावा आणि स्वतःच भलं करून घ्याव. यातच आपलं भलं आहे.

मित्रांनो पहिली गोष्ट. आचार्य चाणक्य म्हणतात की तुमच्याकडून जर कोणी पैसे उधार घेतल असेल. आणि ती समोरची व्यक्ती जर पैसे देत नसेल तर लाजू नका लाज न बाळगता तुमच्या हक्काचे पैसे तुम्ही परत मागा मित्रांनो त्या व्यक्तीला ज्या वेळी गरज होती तेव्हा तुम्ही त्यांची गरज भागवलीत.

तुम्ही त्याचं काम पूर्ण केलं कदाचित तुम्ही त्यावेळी तुमचं स्वतःचं काम मागं ठेवलं आणि त्याचं काम व्हावं यासाठी त्याला उदार पैसे दिले. मात्र आता पैसे मागताना तुम्ही का म्हणून लाज बाळगता. कदाचित तुम्हाला असे वाटते जर तुम्ही पैसे पुन्हापुन्हा मागितले घेतले तर तुमच्यातील संबंध बिघडतील रिलेशनशिप खराब होईल असं काही होणार नाही.

हे बघा नातेसंबंध मैत्री फ्रेंडशिप हे एका ठिकाणी असते आणि व्यवहार एका ठिकाणी असतात. नातेसंबंध आणि व्यवहार मध्ये वेगळेपणा आपल्याला ठेवावाच लागेल. तरच आपलं नुकसान टळणार आहे.

याउलट जर तुम्हाला पैशाची गरज आहे. उदाहरणार्थ तुम्हाला नवीन बिजनेस सुरू करायचा आहे. एखादं नवीन दुकान टाकायचे आहे. आणि तुमच्याकडे पैसे नाही आहेत.

अशावेळी तुम्ही लाज न बाळगता पैसे मागा कोणालाही मागा अगदी बँकेत जाऊन तुम्ही लोन सुद्धा मागा. या ठिकाणी तुम्ही लाज बाळगायची नाही कारण तुम्ही जर या ठिकाणी लाजलात जर तुम्ही लाज बाळगली तर तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे मिळणार नाहीत. तुमचा उद्योग उभारणार नाही.

मित्रांनो दुसरी गोष्ट. आचार्य चाणक्य म्हणतात जेवण ग्रहण करताना कधीही लाजू नये. याचे कारण आहे की आपल्या शरीराला अन्नाची खूप गरज असते. जेव्हा आपण एखाद्या मित्राकडे जेवायला जातो. किंवा पाहुण्यांच्या घराकडे जातो तेव्हा हे लोक तुम्हाला जेवणाचा आग्रह करतात.

पण तुम्ही जेवताना लाजता. तुम्हाला असे वाटते की हे दुसरे काय म्हणतील. मित्रांनो दुसरे काय म्हणतील याचा विचार करू नका. आणि जे जेवताना तुम्हाला नावे ठेवतील.

लक्षात घ्या ते तुमचे मित्रच नाहीत. किंवा ते तुमचे पावणेसुद्धा नाहीत. आणि अशा ठिकाणी पुन्हा जेवायला जाणे हे आपण टाळलेलेच चांगलं. आणि जर आपल्या शरीर तंदुरुस्त ठेवायचा असेल तर आपण जेवताना कधीही लाजू नये.

मित्रांनो तिसरी गोष्ट.आचार्य चाणक्य म्हणतात ज्ञान ग्रहण करताना कधीही आपण लज्जा बाळगू नये. मित्रांनो तुम्ही स्वतः शाळेला किंवा कॉलेजला जात असाल किंवा तुमची मुले जात असतील. किंवा तुमची नातवंडे जात असतील.

त्यांना सांगा सध्याची शिक्षण व्यवस्था ही अशी आहे ती पैसे घेऊन ज्ञान अर्जंन केले जाते. सध्याचे शिक्षक सध्याचे प्राचार्य हे तुमच्या कडून पैसे घेऊनच तुम्हाला ज्ञान देत असतात.

आणि म्हणून शिक्षण घेताना तुमच्या मनामध्ये काही काही शंका येत असतील ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत अशा गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा विचारा शिक्षकांना विचारा की मला हे समजले नाही मला हे समजावून सांगा.

कारण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला जॉब करावा लागणार आहे. आणि नोकरीची संधी प्राप्त होण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची खूप गरज असते. ज्ञान हीच आजच्या जगामध्ये ताकद आहे.

तुम्हाला जर चांगला जॉब पाहिजे चांगली नोकरी हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ज्ञानच कामाला येणार आहे.. कोणत्याही ठिकाणी जरी तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर ते घ्यायला लाजू नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment