बोल्डनेसचा ओव्हर डोस दाखवते आहे सध्या ही मराठी अभिनेत्री..

सैराट यि मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केलं आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून.. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.


• नुकतंच रिंकून राजगुरू ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला रिंकूचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे. रिंकूचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतही आहे. तिने हा फोटो शेअर करून केवळ एक तास झाला होता.


• एका तासांत तब्बल १२ हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. तू खूपच छान दिसत आहेस असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. पण रिंकूने हा फोटो लगेचच डीलिट देखील केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेकवेळा रिंकू फोटो अपलोड केल्यानंतर काहीच तासांत ते डीलीट करत आहे.


• काही दिवसांपूर्वी देखील रिंकूने तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.


• ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे.


• छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Leave a Comment