बॉक्स ऑफिसवर कोणताही पिक्चर चालला तरी पैसे या चार घरांमध्ये जातात.. कोणत्या आहेत या चार फॅमिली जरूर वाचा.!!

मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना आजकाल सिनेमात काम करण्याची इच्छा असते. त्यासाठी आपण अनेक स्वप्ने रंगवत असतो. परंतु मित्रांनो बॉलिवूडमध्ये काम करायचं म्हटलं की, ओळखी असणे खूप गरजेचे असते. आपल्यात भरपूर टॅलेंट असले तरीदेखील त्याचा काहीच उपयोग होत नाही. तसेच बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा देखील वावर मोठ्या प्रमाणात आपणाला पहायला मिळतो.

बॉलिवूड मधून आपण जर साउथ इंडियन चित्रपटाकडे पाहिले तर या सिनेमासृष्टीत चार घराणे अशी आहेत की, त्या घरान्यानी दुसर्‍या कुणालाच येऊ दिले नाही. या चार घरांनी सर्व तेलुगु विश्व आपल्या ताब्यात घेतलेल आहे. हे चार घराणेशाही कुटुंब साऊथ सिनेमा सृष्टी तच नव्हे तर बॉलीवूडवर देखील खूपच भारी पडताना आपल्याला पाहायला मिळते. या घराण्यांनी इंडस्ट्री खूपच पुढे नेली आहे.

या चार घराणेशाहीमुळे तेलगू सिनेमा खूपच नाव कमवत आहे. या चार घराणेशाही म्हणजे अल्लू अर्जुन ची फॅमिली, चिरंजीवी फॅमिली, अक्की नेरी फॅमिली, एनटीआर फॅमिली.या चार फॅमिलीनी साउथ इंडिया सिनेमा जगत उंचावर पोहोचवले आहे.

तर या चार कुटुंबाविषयी आपण थोडेफार जाणून घेऊया. पहिली फॅमिली आहे चिरंजीवी फॅमिली.
माझं घर माझ्यापासूनच सुरू होते त्याप्रमाणे चिरंजीव फॅमिली मेगास्टार चिरंजीवी पासून सुरू होते. चिरंजीवी, नागेंद्र बाबू आणि पवनकल्याण असे हे तीन भाऊ. मोठा भाऊ चिरंजीवी पासून यांची फॅमिली सिनेमासृष्टीत आली. पुढे चिरंजीवी ला तीन मुले झाली सुष्मिता, श्रीजा आणि रामचरन.

रामचरण हा खूपच टॅलेंटेड हिरो आहे. हे तुम्हाला माहीतच असेल. तेलगु सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. नागेंद्र बाबू याना दोन मुले आहेत. निहारिका आणि वरून तेज. हे दोघेही तेलुगू सिनेमा मध्ये काम करतात. पवन कल्याण यांच्या बाबतीत आपण काय बोलणार. तेलगू सिनेमाचा पॉवर स्टार म्हणून पवनकल्याण यांची ओळख सर्वत्र गाजलेली आहे.

दुसरी फॅमिली म्हणजे अल्लू फॅमिली.
चिरंजीवी ची बायको सुरेखा ही अल्लू राम लिंगा यांची मुलगी. अल्लू राम लिंगा हे जुने तेलगु सिनेमातले हिरो होते. तसेच ते स्वातंत्र्य सैनिक देखील होते.

सुरेखा ही अल्लू रामलिंगा यांची बहीण आहे. अल्लू यांनी बॉलिवूडला शंभर कोटींचा सिनेमा दिला आणि तो म्हणजे गजनी. बॉलीवूड मधील एक मोठे टॉलीवूड म्हणून अल्लू राम लिंगा यांचा दबदबा आहे. यांना तीन मुली आहेत. एक अल्लू बॉबी, अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरिष. यांच्यापैकी अल्लू अर्जुन आणि अल्लू शिरिष हे दोघे अभिनेते आहेत. अल्लू अर्जुन हे थे हिएटरवर आले की बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालतात. त्यांचा पुष्पा हा सिनेमा खूपच गाजलेला आहे.

अल्लूअर्जुन आणि चिरंजीवी हे त्यांच्या फॅमिली मुळे एकदम जवळचे नातलग आहेत. आपल्याला रामचरण आणि अल्लू अर्जुन हे दोघे भाऊ आहेत असे वाटते पण ते खरंच भाऊ आहेत.

आता तिसरी फॅमिली आहे ती म्हणजे एनटीआर फॅमिली. एंटी रामराव हे बॉलीवूड मधील सर्वात मोठे ऍक्टर आहेत. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे ते तीन वेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यांची दोन मुले नंदामुरी हरिकृष्णा आणि नंदामुरी बाळकृष्ण. यांनी हीच परंपरा पुढे नेली. हरीकृष्ण यांचा मुलगा इंडस्ट्रीतील मोठा ॲक्टर झाला आहे. त्याचा नुकताच त्याचा आर आर आर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

पुढची मोठी फॅमिली म्हणजे अक्किनेरी फॅमिली. अक्किनेरी फॅमिली ही तेलुगु फॅमिली वर प्रचंड मोठे राज्य करणारे पॉवर हाऊस आहे. नागेश्वरराव अक्किनेरी यांनी टॉलिवूडमध्ये मोठे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पाच मुलांपैकी नागार्जुन बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवलेल आहे आणि यांची दोन मुले नागा साईट धन्य आणि अखिल आता इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत.

अशाप्रकारे या चार फॅमिलीनी इंडस्ट्री खूपच मोठी केलेली आहे. आता टॉलिवूडमध्ये सिनेमा आला की पैसे मिळतात ते या फॅमिलीना. कारण सगळं मार्केट त्याचंच आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन मनोरंजनात्मक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment