ब्रह्मा मुहूर्त म्हणजे काय.? ब्रह्मा मुहूर्ता चे दहा फायदे ब्रह्म मुहूर्तावर का उठावे.? काय करावे.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय व या वेळेत काय करावे ब्रह्म मुहूर्ता चे दहा फायदे काय याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ब्रह्म मुहूर्तावर उठावे सूर्याला अर्घ द्यावा. मानवाच्या जीवनात किंवा प्रत्येक प्राणिमात्रांच्या जीवनात ब्रह्म मुहूर्त महत्त्वाचा आहे.

पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्म मुहूर्त असा शब्दच नाही आहे ब्राह्म मुहूर्त असा शब्द आहे. पण बोलीभाषेमध्ये आपण सर्वजण ब्रह्म मुहूर्त असे म्हणतो आपल्या सनातन धर्मामध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठावे असे सांगितले आहे व त्याचे किती पाहिजे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्याच्या अगोदर मुहूर्ताची वेळ बघूया कोणती आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदय, संध्याकाळ, प्रदोषकाळ, सूर्यास्त, रात्र, मध्यान, मध्यम दिवस, मध्यम रात्र, असे किती प्रकार आहेत. त्याचबरोबर प्रहार पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर असे दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर आणि चौथ्या प्रहर मध्ये ब्रह्म मुहूर्त आहे.

ही पहाटेस तीन वाजून पंचेचाळीस मिनिट ते पाच वाजून तीस मिनिट असा पावणे दोन तासाचा हा ब्रह्म मुहूर्त असतो या मुहूर्तावर आपले ऋषीमुनी साधना करतात.

ब्रह्मा मुहूर्ता चे फायदे पुढील प्रमाणे
पहिला फायदा – पृथ्वीच्या सर्व प्राणिमात्रांना जो ओझोन वायू लागतो तो या वेळेस पृथ्वीच्या सगळ्यात खालच्या थरास येतो. या ओझोनमुळे जो ऑक्सिजन मिळतो तो श्वसनासाठी चांगला असतो. तो अजून वायु म्हणजे प्राण ऑक्सिजन सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिळतो.

दुसरा फायदा – याकाळात प्राणायाम चालू केल्यामुळे किंवा उजवी नाकपुडीतून दीर्घ श्वास घेतले असता रक्त शुद्ध होते. रक्तात अक्सिजन वाढल्याने हिमोग्लोबिन वाढते त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते व रोगांपासून मुक्ती मिळते.

तिसरा फायदा – या काळात मंद प्रकाश असतो त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या डोळ्यावर तीव्र प्रकाश पडत नाही व त्यामुळे डोळ्याचे विकार घडत नाहीत व दृष्टी चांगली होते म्हणून ब्रह्म मुहूर्तावर उठावे

चोथा फायदा – यावेळी पृथ्वीवर पंचातत्वा पैकी वायू तत्व हे जास्त प्रमाणात वातावरणात असते व मानवी शरीराला मनोविसरण व शरीर शुद्ध करण्यासाठी खूप चांगला असतो. हा वायू कार्यरत असताना यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते व मूळव्याधाचा त्रास होत नाही. पित्त वात यासारखे प्रकार होत नाहीत आणि त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते यामुळे ब्रह्म मुहूर्तावर उठावे

पाचवा फायदा – शरीरातील नव्या इंद्रियातून शरीरातील घाण बाहेर काढली जाते ती इंद्रिय म्हणजेच डोळा, कान नाक तोंड शिश्न द्वार गुदद्वार यामार्फत शरीरातील जी जमा झालेली रात्रीची घाण आहे ती टाकली जाते व आपण निरोगी राहतो

सहावा फायदा – सर्वात महत्वाचे म्हणजे शरीर साफ करणे म्हणजे स्नान करणे ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यामुळे आपल्या शरीरावरची लहान छिद्रे असतात ती लहान छिद्रे प्राणवायू शोषून घेतात व आपल्या शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायू मिळतो त्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते व आपण फ्रेश राहतो

सातव्या फायदा – या काळामध्ये ज्ञानंद्रिये म्हणजे मेंदूतील स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते यामुळे ऋषीमुनी या काळात तंत्र मंत्र साधना ध्यान करत असत. जी मुले शिक्षण करतात व अभ्यास आहेत ती या वेळेतच अभ्यास करतात कारण या वेळेस अभ्यास केल्याने मेंदूतील स्मरण शक्ती वाढते व पाठांतर होते व त्याच बरोबर ओमकार जात केला तर आपल्या मेंदूतील स्मरणशक्ती बरोबर सर्व ज्ञानेंद्रिये कार्यरत होतात म्हणून मंत्र ध्यान धारणा अभ्यास त्या वेळेस करावा असे शास्त्रात सांगितले आहे.

आठवा फायदा – या काळात स्नान केल्यामुळे आपल्या शरीरातील लहान छिद्रे सूर्यप्रकाशातील लहरी म्हणजेच सूर्यप्रकाशाची किरणे शोषून घेतात यामुळे आपल्याला डी जीवनसत्त्व मिळते त्यामुळे आपण निरोगी राहतो

नऊवा फायदा – कुंडलिनी जागृत करण्यासाठी या काळात ओम मंत्राचा जॉब केल्यास शरीरातील सप्त चक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्यामुळे जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात या कंपनीद्वारे कुंडलिनी जागृत होते

दहावा फायदा – या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मी, सिद्धात्मी हे पृथ्वीवर आलेल्या असतात व त्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व त्यांच्या पुण्याईमुळे आपल्या पितृ दोषासारखे दोष लागत नाहीत व आपले पूर्वज आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळे आपले जीवन सुंदर व सुरळीत होते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment