Wednesday, October 4, 2023
Homeजरा हटकेब्रेकअप झाल्यानंतर मुलांपासून लपवून, मुली करत असतात ही 6 कामं..!! यातलं पहिलं...

ब्रेकअप झाल्यानंतर मुलांपासून लपवून, मुली करत असतात ही 6 कामं..!! यातलं पहिलं काम तर..

मित्रांनो, ब्रेकअप हा टर्निंग पॉईंट जवळ जवळ सर्वांच्या लाइफ मध्ये येऊन गेलेला असतो. पण जेव्हा कुणाचा ब्रेक अप होतो तेव्हा काहीजण प्रेमाच्या या जुन्या आठवणींतून किंवा जुन्या नात्यातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. जुन्या नात्यांतील अटॅचमेंट मधून स्वत: ला वेगळं करण्यासाठी काही लोकांना बराच काळ जाऊ द्यावा लागतो.

एकंदरीत अशा प्रकरणांत, जुनी अटॅचमेंट आणि जुन्या गोष्टी विसरण्यासाठी मुलीच जास्त वेळ घेत असतात. पण तरीही ब्रेकअपनंतर, मुली बरेच प्रयत्न करत असतात जुन्या आठवणी विसरायला, पण त्या लवकर मूव्ह ऑन करुच शकत नाहीत. चला तर ब्रेकअप झाल्यानंतर मुली कोण कोणत्या गोष्टी करतात ते आज जाणून घेऊयात.

ब्रेकअप होण्यापूर्वी जिथे मुली आपला सर्व वेळ आपल्या जोडीदाराला देत असतात, या उलट त्या ब्रेकअपनंतर आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवतात.

त्यांच्या अशा मैत्रिणींबरोबर राहतात ज्या त्यांचे अंतःकरणातील आर्तता ऐकू शकतील आणि त्यांना समजून घेतील, तसेच चांगला सल्लाही देऊ शकतील. अशा क्लोज मैत्रिणींबरोबर त्या मुली वेळ घालवतात.

कधीकधी ब्रेकअप नंतरही नातं पूर्णपणे संपत नाही. बरेच प्रश्न, शंका मनात राहून जातात. अशा परिस्थितीत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मुली मित्रांची मदत घेतात.

जेणेकरून त्यांना कळेल की त्यांच्या एक्स जोडीदाराच्या आयुष्यात काय चालले आहे. याविषयी इतरही बरीच माहिती एकत्रित करण्यासाठी मित्र आणि कधी कधी सोशल मीडियाची मदत त्या घेतात. म्हणजेच फेसबुक, इन्स्टा वैगेरे यावर त्या एक्स च्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात.

बर्‍याच वेळा त्या दोघांची सोशल मीडियावर ब्लॉक अनब्लॉक करण्याचा सिलसिला चालू राहतो. बर्‍याच वेळा मुली एक्सला सोशल मीडियावरुन दिर्घकाळ वाट बघून अनब्लॉक करतात.

ब्रेकअपनंतरही बर्‍याच वेळा मुलींकडून एक्स जोडीदाराला फोनवर किंवा मेसेजद्वारे खरी खोटी सुनावली जाते. आणि ब्रेकअपनंतर बर्‍याच मुली सोशल मीडियावर अधिक अ‍ॅक्टिव्ह होतात.

यातुन त्या हे शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतात की त्या या अटॅचमेंटमधून मूव्ह ऑन झालेल्या आहे. आणि एक्स च्या जाण्याने त्यांना काहीही फरक पडलेला नाही. त्याच्या पश्चात त्या अगदी आनंदात आहेत.

स्वत: ला या तणावापासून दूर ठेवण्यासाठी, मुली खूप खरेदी करतात. आणि पार्ट्याही करतात. बर्‍याच वेळा, ताणतणावापासून दूर राहण्यासाठी, त्या स्वत: ला व्यस्त ठेवतात.

त्यापैकी खरेदी ही एक चांगली स्ट्रेस बस्टर आहे, हा असा मुलींचा समज आहे. याशिवाय ब्रेकअपनंतर बहुतांश मुली जास्त करुन पार्टी करतात जेणेकरून त्या नवीन लोकांना भेटू शकतील आणि त्यांच्या एक्स ला जळविण्याचा प्रयत्न करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स