बुध ग्रहाचा 68 दिवस वृषभ राशीत संचार, या 3 राशींना मिळणार भरपूर आर्थिक लाभ.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या मानवी जीवनावर आणि पर्यायाने पृथ्वीवर देखील होतो. हे संक्रमण त्या त्या राशीनुसार काही व्यक्तींसाठी शुभ तर काहीं राशींसाठी अशुभ ठरत असते. व्यापारात प्रगती आणि बुद्धिमत्ता देणाऱ्या बुध ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला असून तो या राशीत 68 दिवस राहणार आहेत.

24 एप्रिलपासून बुध ग्रह वृषभ राशीत आहेत. पण 11 मे पासून वक्री होणार असून 4 जूनपासून मार्गस्थ होणार आहेत. 2 जुलैपासून मिथुन राशीत जाणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा व्यवसाय, स्टॉक आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. याचा अर्थ, जेव्हा जेव्हा बुध ग्रहाचं गोचर होते तेव्हा या क्षेत्रांवर विशेषत: प्रभाव पडतो. तसेच 12 राशींवर देखील या बदलाचा परिणाम होतो. पण तीन राशी आहेत ज्यांना या बदलाचा चांगला फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशी आहेत.

मेष रास – बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या दुसऱ्या भावात बुध ग्रहाचे भ्रमण होत आहे. या स्थानाला पैशाचे आणि वाणीचे घर म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तसेच, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर तुम्ही व्यवसायात करार करू इच्छित असाल तर ही वेळ अनुकूल आहे. ज्या लोकांचे करिअर भाषणाच्या क्षेत्राशी संबंधित आहे, जसे की वकील, मार्केटिंग कामगार आणि शिक्षक, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर सिद्ध होऊ शकतो.

कर्क रास – तुमच्या राशीच्या अकराव्या भावात बुधचे भ्रमण आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची चिन्हे आहेत. तसेच व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. आपण व्यवसायातील कोणत्याही नवीन उपक्रमात गुंतवणूक देखील करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळू शकतात.

सिंह रास – बुध ग्रहाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रहाने तुमच्या दहाव्या भावात भ्रमण केले आहे. या स्थानाला कामाची व्याप्ती आणि नोकरीची स्थान असं म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.

व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यासोबतच व्यवसायात नवीन नातीही तयार होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, तुमच्या कार्यशैलीमध्ये सुधारणा होईल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तुम्हाला कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!