बुध ग्रह मेष राशीत 15 मे पासून होणार मार्गी, या राशींना मिळणार पाठबळ..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… बुध ग्रह 15 मे पासून होणार मार्गस्थ, या राशींची आर्थिक कोंडी फुटणार..

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रानंतर सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह म्हणजे बुध. सध्या मेष राशीत असलेल्या बुध ग्रहाचा 10 मे रोजी सकाळी 5 वाजून 39 मिनिटांनी उदय झाला आहे. वक्री अवस्थेत उदय झालेल्या बुध ग्रह 15 मे पासून मार्गी होणार आहे. तसेच 7 जूनला संध्याकाळी 7 वाजून 44 मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करते. सध्याच्या स्थितीचा कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल जाणून घेऊयात..

या राशींवर होणार सकारात्मक परिणाम…

मीन रास – या राशीच्या द्वितीय म्हणजेच धनस्थानात बुध ग्रहाचा उदय झाला आहे. त्याचबरोबर मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना आर्थिक लाभ मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. आपल्या वाणीच्या जोरावर काही कठीण कामं सहज पूर्ण कराल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. घर किंवा वाहन खरेदीसाठी योग्य काळ आहे. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढेल.

मिथुन रास – या राशीच्या एकादश भाव म्हणजेच लाभ भावात बुधाचा प्रभाव असणार आहे. यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा या काळात मिळू शकतो. कुटुंबातील मोठी व्यक्ती किंवा भावाचा सहकार्य मिळेल. बॉससोबत संबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या. नवदांपत्यांसाठी संतान प्राप्तीचा योग आहे.

कर्क रास – या राशीच्या दशम भाव म्हणजेच कर्म भावात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या काळात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. नवी नोकरी स्वीकारण्यासाठी गोचर अनुकूल आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. जमीनीशी निगडीत प्रकरणं निकाली लागतील. वाहन खरेदीचा योग जुळून येईल.

सिंह रास – या राशीच्या नवम भाव म्हणजेच भाग्य स्थानात बुध ग्रह गोचर करणार आहे. धर्म आणि आध्यात्मिक प्रगती या काळात होईल. हाती घेतलेल्या कामाचं कौतुक होईल. या तुमच्या हातून दानासारखं पुण्याचं काम होईल. कुटुंबात वाद होतील असं वागू नका. प्रवासाचा योग जुळून येईल.

तूळ रास – या राशीच्या सप्तम भावात म्हणजेच वैवाहिक भावात बुध गोचर आहे. वैवाहिक जीवनात चांगली बातमी कानी पडेल. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. नवे करार या काळात निश्चित होऊ शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment